मुंबईत फेब्रुवारी महिन्यात आयोजित महासंस्कृती महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

Date:

मुंबई, दि. २ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवामध्ये सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम, प्रदर्शनीय दालनेही असणार आहेत. त्यासाठी इच्छुक संस्था, कलाकार संच/समूह/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था यांच्याकडून ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधितांनी अर्ज rdcmumbaicity@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा तहसीलदार तथा रचना व कार्यपद्धती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रुम नं. १०७, पहिला मजला, जुने जकात घर, फोर्ट मुंबई- ०१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या महोत्सवात आपल्या राज्यातील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, कवितांचे कार्यक्रम व व्याख्याने, देशभक्तीपर गीते, जिल्ह्यातील स्थानिक सण, उत्सव आदीबाबत विविध कार्यक्रम आणि राज्य संरक्षित स्मारके आणि गडकिल्ले यांची माहिती सादर केली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...