पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.

यामध्ये महसूल विभागाच्यावतीने २ हजार १५०, पंचायत समितीअंतर्गत ६३७, पशुसंवर्धन विभाग ४०, आरोग्य विभाग १३४, कृषी विभाग ३८२, महावितरण १८२, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ ३, भूमी अभिलेख २ आणि पुरवठा विभागाअंतर्गत ३६० याप्रमाणे एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विषयक विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करून, ७/१२ उतारे, फेरफार, ७/१२ दुरुस्ती, विविध दाखले तसेच विविध विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, या शिबारात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कोलते-पाटील यांनी केले आहे.

