पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग स्पर्धेत सारडा स्टॅलियनवर मात
पुणे : धीरज मंत्रीच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर प्रारव पँथर्स संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (बेहडे पीएमपीएल) क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत सारडा स्टॅलियन संघावर आठ गडी राखून मात केली आणि विजेतेपद पटकावले. यानंतर मास्टर स्मॅशर्स संघाने हाय-बाइट चॅलेंजर्स संघावर पाच गडी राखून मात केली आणि तिसरा क्रमांक पटकावला.
नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली. अंतिम लढतीत सारडा स्टॅलियन संघाने मुकुल जाजूच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित १६ षटकांत ३ बाद १४६ धावा केल्या. मुकुलने २५ चेंडूंत ११ चौकारांसह ५४ धावा केल्या. मुकुलने रोहित राठीने सहा षटकांत ६३ धावांची सलामी दिली. यानंतर मुधुसुदन कलंत्री (५) आणि करण सारडा (१) झटपट बाद झाले. यानंतर रोहितने यश लढ्ढाच्या साथीने ६८ धावांची नाबाद भागीदारी रचली. रोहितने ४१ चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद ४७, तर यशने १७ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या.
प्रारव पँथर्स संघाने विजयी लक्ष्य १४.१ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले. विजयाचा शिल्पकार ठरला तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज धीरज मंत्री. नितीश मनियार (९) बाद झाल्यानंतर धीरजने हर्ष दरकच्या साथीने ९६ धावांची भागीदारी रचली. हर्ष २७ चेंडूंत चार चौकारांसह ३५ धावा करून बाद झाला. यानंतर धीरजने गोविंद राठीच्या साथीने प्रारव पँथर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धीरजने ३६ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार बूब, बेहडे ग्रुपचे निशांत बेहडे, मेटारोल ग्रुपच्या राधिका बिर्ला, क्रीडा अध्यक्ष नीरज धूत, क्रीडा सचिव गितेश झंवर, युवा अध्यक्ष रोनक झंवर, युवा सचिव मनीष मणियार, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश सोमानी, गणेश भुतडा आदी उपस्थित होते.
अभय करवा, राकेश लद्दड, संतोष जाजू, अभय जाजू, भूषण भट्टड, सचिन चांडक, मनोज डागा, राहुल भुतडा, अजय झंवर, नवल भुतडा, प्रद्युमन भूतडा, शुभम मंत्री, स्वप्नील बांगड, पियुष भुतडा, गोविंद डागा, हिमांशू सोनी, शुभम डाल्या, चिराग मुंदडा, नरेश बाहेती यांसह युवा च्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेचे आयोजन केले. योगेश मुंदडा, प्रतीक कालिया, भूषण मानधने, पार्थ लाहोटी यांनी स्पर्धेदरम्यान संपूर्ण निवेदन केले.
स्पर्धेसाठी बेहडे बिल्डकॉन एलएलपी निशांत बेहडे व परिवार हे मुख्य प्रायोजक होते, त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेला पाठिंबा दिला. मेटारोल श्रीमती राधिका बिर्ला हे को-टायटल स्पॉन्सर होत्या. बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. हे व्हेन्यू स्पॉन्सर, जीबी ग्रुप गणेश भुतडा ट्रॉफी स्पॉन्सर, तर मॅजेस्टिक लँडमार्क कैलाश मुंदडा जर्सी स्पॉन्सर व युट्युब लाईव्ह स्पॉन्सर मेहुल शाह म्हणून सहभागी आहेत. याशिवाय डीडब्ल्यू रिअल्टर्स अँड लॉ फर्म, स्वनिती, तिरुपती सेल्स एम्पोरियम आणि अरुणकुमार अँड कंपनी हे असोसिएट स्पॉन्सर्स म्हणून सहभागी झाले होते.
धावफलक : सारडा स्टॅलियन – १६ षटकांत ३ बाद १४६ (मुकुल जाजू ५४, रोहित राठी नाबाद ४७, यश लढ्ढा नाबाद ३१, गोविंद राठी ४-०-१७-२) पराभूत वि. प्रारव पँथर्स – १४.१ षटकांत २ बाद १५२ (धीरज मंत्री नाबाद ७९, हर्ष दरक ३५, गोविंद राठी नाबाद १९, सागर कारवा २-०-१७-१, रोहित राठी २-०-२२-१). मॅन आॅफ दि मॅच – धीरज मंत्री
तिसऱ्या क्रमांकाची लढत : हाय-बाइट चॅलेंजर्स – १२ षटकांत ८ बाद ११० (मधुर जेठलिया ६७, कन्हैया लढ्ढा १२, केदार बजाज ३-०-२८-२, नयन भन्साली ३-०-२४-२, कपिल धूत २-०-११-२) पराभूत वि. मास्टर स्मॅशर्स – १०.३ षटकांत ५ बाद ११४ (केदार बजाज ५१, अखिल तपाडिया १८, सुदर्शन हरकुट ३-०-२६-२).

