नौकरदार महिलेचा लैंगिक छळ:आनंद राठी वेल्थ कंपनीचे कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती, राकेश रावल, फिरोज अजीज, तेजल शाह सह पाच जणांवर गुन्हा दाखल

Date:


पुणे :कामावरील महिलेशी लगड करण्याचा प्रयत्न करुन बळजबरी करुन आनंद राठी वेल्थ कंपनीचे कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती यांनी वारंवार विनयभंग केला. त्याची तक्रार सीईओ,एचआर हेड यांच्याकडे केल्यानंतरही त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले.उलट महिलेने तक्रार करु नये, म्हणून तिला करीयर संपवुन टाकण्याची धमकी देऊन सुडबुद्धीने दुबईत बदली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आनंद राठी वेल्थ कंपनीच्या पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आनंद राठी वेल्थ कंपनीचे कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती , सी ई ओ राकेश रावल , जॉईंट सी ई ओ फिरोजी अजीज , एच आर हेड तेजल शाह आणि कार्यकारी संचालक सोनाली रावल (Anand Rathi Wealth Company’s Sonali Raval)अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३३ वर्षाच्या महिलेने मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्यात मे २०२४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान घडला असल्याने त्यांनी गुन्हा दाखल करुन तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. आनंद राठी वेल्थ लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची बिगर बँक संपत्ती व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. वैयक्तिक आणि कॉपोरेट ग्राहकांना आर्थिक नियोजन, म्युच्युअल फंड वितरण आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा प्रदान करते. भारताबाहेर दुबई आणि युनायटेड किंगडम येथे त्यांच्या शाखा आहेत. कंपनीचे गणेशखिंड रोडवर मुख्य कार्यालय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आनंद राठी वेल्थ कंपनीमध्ये कामावर असताना कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती याने महिलेशी लगड करण्याचा प्रयत्न करुन वेळोवेळी विनयभंग केला. त्यानंतर तक्रार करु नये, म्हणून करीअर संपवून टाकीन अशी धमकी दिली. सातत्याने पाठलाग केला आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ केला. याबाबत त्यांची कार्यालयात तक्रार करुन सुद्धा आरोपीवर आजतागायत कोणतीही कारवाई केली नाही. स्वपन चक्रवर्ती याच्या चालू असलेल्या लैंगिक छळा बाबत इतरांना माहिती देऊन सुद्धा त्यांनी आरोपीकडे दुर्लक्ष करुन स्वपन चक्रवर्ती याला प्रोत्साहन देऊन कामाच्या ठिकाणी फिर्यादी यांचा अपमान केला. त्यांची सुडबुद्धीने दुबई येथे बदली केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा ज्योतिराव फुले

एप्रिल 11, 2026 भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस...

“ए आय चा विवेकी वापर  व्हावा” :संवाद कार्यक्रमातील सूर 

 सत्यशोधक विचार आणि एआय' विषयावर संवाद कार्यक्रम   महात्मा फुले यांच्या...

एमआयटी एडीटीचा बेंटली सिस्टिम्ससोबत करार

डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’ उत्कृष्टता केंद्र सुरू पुणे...