पुणे-
पुणे महानगरपालिकेच्या कर आकरणी व करसंकलन प्रमुख रवी पवार यांनी म्हटले आहे कि,’ विभागामार्फत सन २०२६-२७ ची सर्व देयके तयार करण्यात आली आहेत, नागरिकांच्या सोयीसाठी व कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मिळकत कराच्या सर्वसाधारण करामध्ये ५/१०% सवलत जाहीर करण्यात आलेली आहे.
ही सवलत दि. ३१ मे २०२६ पर्यंत लागू राहणार असून, जे नागरिक आपला संपूर्ण मिळकतकर विहित मुदतीत भरतील त्यांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
तरी, सर्व मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, दिलेल्या मुदतीत आपला संपूर्ण मिळकतकर भरून सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिक आपला कर ऑनलाईन भरू शकतात.
नागरिकांच्या सोयीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय., कॉसमॉस बँकेत देखील आपला मिळकतकर भरता येणार आहे तसेच पुणे महानगरपालिकेचे सर्व CFC (नागरी सुविधा केंद्र) सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत सुरु राहणार असून नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही, फार काळ थांबावे लागणार नाही याकरिता जास्तीत जास्त मिळकतधारकांनी ऑनलाईन पध्दतीने propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर आपला मिळकतकर भरावा. नागरिकांनी या सुविधांचा उपयोग करून शहराच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

