अन प्याद्यापासून सुत्रधारापर्यंत पोलिसांनी धरपकड करण्याचे केले आवाहन
सारे आरोप खोटे आणि चुकीचे—दरम्यान या प्रकरणी मिडिया पर्सन कदम याने माय मराठी शी बोलताना आपली बाजू मांडताना सांगितले कि या ठिकाणी बांगला देशी तरुणी असल्याची माहिती मिळाल्याने मी एकटाच येथे स्ट्रिंग ऑपरेशन करायला गेलो होतो ,मात्र मी पकडलो गेलो नाही तेथून माझी उपस्थिती समजताच मी पळून गेलो रिक्षाने घरी आलो . ,माझ्यावर केले गेलेले सारे आरोप खोटे आणि चुकीचे असून अन्य कोणत्याही पत्रकाराचा यात समावेश नाही. खंडणी पैसे याबाबतचे आरोप तर निखालस खोटे आहेत . मला घर भाड्याला नाकी नऊ येते आणि एवध्या पैशांचे आरोप हे करत आहेत . आता यापुढे जे काही बोलेले ते मी वकिलांचा सल्ला घेऊन बोलेल असेही कदम याने स्पष्ट केले आहे.
पुणे – पक्षात शून्य किंमत असणाऱ्या एका महिलेने 25 लाख रुपयांची खंडणी घेऊन काही पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी उपरोक्त आरोप केला. त्या म्हणाल्या,पक्षातील ‘शून्य किंमत’ असलेल्या एका महिलेने 25 लाख रुपयांची खंडणी देऊन काही पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले आहे. या कटाचा भाग म्हणून एका नामांकित चॅनेलचे पत्रकार कदम तीन दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये गेले होते. तिथे त्यांनी दारू पिऊन शेजारील खोलीतील एका महिलेचे चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित महिलेने कदम यांना मारहाण केली आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता,कदम यांनी आपण ‘स्टिंग ऑपरेशन’ करत असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन पत्रकार या कटात सहभागी असल्याचा संशय आहे, असे त्या म्हणाल्या. रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट केले की,त्या अशा कोणत्याही षडयंत्राविरोधात पाऊल उचलण्यास सक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आरोप केला की, पक्षातील संबंधित महिलेने पत्रकारांना हाताशी धरून 25 लाख रुपयांची ‘डील’ केली आहे. कदम हा केवळ प्यादा असून,मुख्य आरोपीने तीन पत्रकारांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी ॲड. विजय ठोंबरे यांनी सांगितले की, ते सहसा पत्नीच्या राजकारणात पडत नाहीत, परंतु एखाद्या महिलेची राजकीय कारकीर्द बिघडवणे दुर्दैवी आहे. रोहन कदमने पोलिसांना दिलेल्या जबाबात सदर लॉज रुपाली पाटील यांच्याशी संबंधित असून, त्यांना बोलावण्यास सांगितले होते, असा दावा ॲड. पाटील यांनी केला.ॲड.पाटील यांच्या मते, रोहन कदम लॉजपासून केवळ ४०० मीटर अंतरावर राहतो. स्टिंग ऑपरेशनसाठी गेल्यावर त्याने आपल्या कार्यालयातील वरिष्ठांना याबाबत माहिती दिली नाही. रुपाली पाटील महिला शोषणाविरोधात आवाज उठवतात, त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. कदमला ताब्यात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यापूर्वीही रुपाली पाटील यांच्याबाबत चुकीच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. रोहन कदम लॉजवर गेल्याचे सर्व चित्रीकरण उपलब्ध असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाबही आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी मोठा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
बेरक्याच्या बातमीचा स्फोट
काल बेरक्या या पूर्वीच्या उस्मानाबाद आणि सध्याच्या धाराशिव मध्ये गाजलेल्या ब्लॉगवर पुण्यातील आलेल्या या वृत्ताने चांगलाच स्फोट केला.
काय आली होती हि बातमी पहा


