पुणे, 9 एप्रिल 2026
प्रादेशिक पारपत्र कार्यालय (आरपीओ) पुणे, सामान्य आणि तत्काळ श्रेणीतील अर्जदारांसाठी एक विशेष पारपत्र मोहीम आयोजित करत आहे. ही मोहीम शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी पारपत्र सेवा केंद्र (पीएसके), पुणे येथे आयोजित केली जाईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश पारपत्रासाठी मुलाखत लवकर उपलब्ध करून देणे आणि पारपत्र सेवांच्या वितरणात आणखी सुधारणा करणे हा आहे.
सामान्य पारपत्र श्रेणी अंतर्गत अर्जदारांनी पारपत्र नियमांनुसार विहित संपूर्ण आणि अचूक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांनी ‘Passport India’ संकेतस्थळावरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व पात्रता सुनिश्चित करावी.अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
तत्काळ योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते आणि त्यासाठी अधिक कठोर पात्रता मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अनेक अर्जदार एक किंवा दोन्ही निकषांमध्ये अयशस्वी ठरतात आणि त्यामुळे ते अर्ज यशस्वीपणे सादर करू शकत नाहीत. अर्जदारांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी तत्काल मार्गदर्शक सूचना आणि तत्काळ अंडरटेकिंग काळजीपूर्वक वाचावे आणि भेटीच्या दिवशी कोणतीही संभाव्य समस्या टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व पात्रता सुनिश्चित करावी. तत्काळ अपात्र श्रेणींबद्दल जाणून घेण्यासाठी, कृपया येथे भेट द्या:
https://www.passportindia.gov.in/psp/TatkaalPassports.
[अर्जदाराची खरी ओळख तपासण्यासाठी, पारपत्र कायदा 1967 च्या कलम 5 आणि पारपत्र नियम 1980 च्या नियम 5 मध्ये असे नमूद केले आहे की, पारपत्र प्राधिकारी यासंदर्भात सर्व चौकशी करू शकतात आणि अर्जाच्या योग्य निपटारा करण्यासाठी पारपत्र प्राधिकारीवर्गाला आवश्यक असलेली अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता अर्जदाराला भासू शकते.]
1.विशेष मोहिमेसाठी अपॉइंटमेंट कशी बुक करावी:
i. पासपोर्ट इंडिया संकेतस्थळ (https://www.passportindia.gov.in) किंवा mPassport Seva App ला भेट द्या आणि तात्काळ/सामान्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा.
ii. ऑनलाइन पैसे भरल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’ वर जा, ‘PSK Pune’ स्थान निवडा आणि विशिष्ट तारखेसाठी अपॉइंटमेंट बुक करा.
4. विशेष मोहिमेची तारीख आणि ठिकाणाचा तपशील:
i. तारीख : 11एप्रिल 2026 (शनिवार )
ii.ठिकाण : मॉन्ट क्लेअर बिल्डिंग, 134/1, पार्ट एमपी-1, कमर्शियल पहिला मजला, ऑफिस नं.101 आणि 102, बाणेर पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे – 411021
iii. श्रेणी : सामान्य आणि तात्काळ अपॉइंटमेंट (नवीन आणि नूतनीकरण)
iv.वेळ: सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 (अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज पावतीवर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी हजर रहावे.)

