श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगाने सुरू

Date:

भाविकांना नित्यदर्शनाकरिता मंदिर ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. ७ एप्रिल : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्या पार्श्वभूमी होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण याबाबी विचारात घेवून मंदिर व परिसराचे कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता ९ एप्रिल २०२६ रोजीपासून पुढे ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.

सन २०२७ मधील नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्याप्रमाणात भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता विचारात घेण्यासोबतच वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सुरु आहे.

कुंभमेळ्यावेळी श्री. क्षेत्र भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जुन्या सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून पायरी मार्गाचे काम देखील सुरू सुरु आहे. सद्यस्थितीत मुख्य सभामंडप पूर्ण उतरवून नवीन सभामंडप बांधकाम प्रगतीपथावर आहे. सभामंडप बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामुग्री मंदिर परिसरात असल्याने, चालू कामांचे स्वरुप, भौगोलिक परिस्थिती व भाविकांची संख्या विचारात घेता बांधकाम सुरु असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक आहे. मंदिर सभामंडपाचे साधारणतः ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून घुमटाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच मंदिराकडे जाणा-या प्रवेशमार्गावरील पायरीमार्गाचे काम प्रगतीत असून प्रवेशमार्ग पुर्णतः बंद आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. माहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु होण्याची शक्यता विचारात घेता, त्यापूर्वी ही कामे जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यामुळे सद्यस्थितीत विकास कामांना गती देण्यात आलेली आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

• उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई, दि. ७ :...

2029 चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई, देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान...

भाजपच्या बिनविरोध नीतीचा परिणाम:बारामतीत अपक्षांची झुंबड; उमेदवारांचे अर्धशतक

पुणे: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक पार पडत...