अजितदादांच्या अपघाताचा गुन्हा दाखल केला तर उमेदवारी मागे घेऊ: काँग्रेसचा ‘नेहेले पे देहला”

Date:

भाजप आता खरोखर FIR अगदी योग्य पद्धतीनं दाखल करणार की काँग्रेसच्या विरोधात बारामतीत लढणार

पुणे: काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनीच स्वतः हे जाहीर केलं होतं की, राज्यातील महायुती सरकारनं जर अजित पवारांच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ. पण ही घोषणा उमेदवाराच्या वैयक्तिक पातळीवरील घोषणा असल्याची चर्चा होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अशी कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. पण आता आता तासाभरापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटरवरुन उमेदवार आकाश मोरे यांचं विधानच शेअर केलं आहे. खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच शेअर केल्यानं ही काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, आता भाजप्रणित महायुतीसमोर मोठा पेचप्रसंग असणार आहे. कारण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सातत्यानं अजित पवारांच्या अपघातप्रकरणावर अनेक गोष्टी कशा संशयास्पद आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडं शासनाकडून हा निव्वळ अपघात असल्याचं म्हटलं असून त्याच्या चौकशीचे आदेशही दिले होते. चौकशी अहवालही शासनाला सादर झाला पण अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. रोहित पवारांनी सातत्यानं विमान कंपनी व्हीएसआरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.व्हीएसआर कंपनीचा मालक आणि भाजपच्या नेत्यांचे व्यावसायिक संबंध असल्यानेच सरकार ही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळंच आता काँग्रेसनं बारामतीत उमेदवारी अर्ज भरुन भाजपला गुन्हा दाखल करण्यासाठी कोंडीत पकडल्याची चर्चा आहे. पण आता काँग्रेसच्या या मागणीनंतर फडणवीसांचं महायुतीसरकार काय निर्णय घेतय? हे पाहावं लागणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळं ही निवडणूक बिनविरोध होऊ न दिल्यानं अनेकांनी काँग्रेसवर टीकाही केली आहे.पण काँग्रेसच्या या खेळीनं भाजपला चेकमेट केल्याची आता चर्चा होत आहे. कारण ज्या अजित पवारांच्या नावावरुन राजकारण सुरु आहे, त्याच अजित पवारांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास उमेदवारी मागे घेण्याची अट काँग्रेसनं टाकली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजपच्या बिनविरोध नीतीचा परिणाम:बारामतीत अपक्षांची झुंबड; उमेदवारांचे अर्धशतक

पुणे: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक पार पडत...

पुण्याअगोदर अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीए घालणार ‘हातोडा’; आयुक्तांचा अंतिम अल्टिमेटम!

विशेष मोहीम : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर याच आठवड्यात कारवाईचा...

राज्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही 

मुंबई, 6 एप्रिल 2026 पश्चिम आशियातील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीचा जागतिक...