महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांनी केले कौतुक

Date:

मुंबई, दि. ०६ एप्रिल २०२६: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांनी भेट शनिवारी (दि. ४) भेट दिली व विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.

गोरेगाव येथे ‘इकॅमेक्स-२०२६’चे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते झाले. विद्युत कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्युत क्षेत्राच्या माध्यमातून प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन श्री. नाईक यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा क्षेत्रात राज्याने देशात मोठी आघाडी घेतली आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी शाश्वत व स्वस्त विजेसाठी ऊर्जा परिवर्तनाचा ‘रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठी गती दिली आहे. सौर ऊर्जेच्या योजनांद्वारे सद्यस्थितीत २० लाख ६६ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे. तर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमधून आतापर्यंत ५ लाखांवर घरगुती ग्राहकांनी लाभ घेतल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. नाईक यांनी प्रदर्शनीतील महावितरणच्या दालनाला भेट दिली आणि विविध योजना, उपक्रमांची माहिती घेत कौतुक केले. त्यांचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी स्वागत केले व माहिती दिली. यावेळी विशेष कार्य अधिकारी श्री. सुधन्वा पत्की (नवी दिल्ली), इकॅमचे अध्यक्ष श्री. देवांग ठाकूर, सरचिटणीस श्री. अमरनाथ पाटील आदींची उपस्थिती होती.

या तीन दिवसीय प्रदर्शनीत महावितरणचे मुख्य अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार आणि विद्युत सुरक्षा मोहिमेचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी सोमवारी (दि. ६) विशेष सत्रात विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन केले. महावितरणच्या अभियानामध्ये सहभागी होत ग्राहक संवादाद्वारे विद्युत सुरक्षेचा जागर करण्याची ग्वाही यावेळी इकॅमच्या वतीने देण्यात आली.

महावितरण प्रदर्शनीद्वारे अधीक्षक अभियंता श्री. संजय खंदारे, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र राठौर यांच्यासह अभियंता, अधिकाऱ्यांनी महावितरणच्या विविध योजना व विद्युत सुरक्षेसंदर्भात नागरिकांना माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामती मतदारसंघातून काँग्रेस-रासप-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. आकाश विजयराव मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल.

पुणे-, दि. ६ एप्रिल २०२६बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस...

वसईत जखमी बालकाची रुग्णालयांत फरफट; हलगर्जीपणावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

रुग्णालयांची माहिती देणारा 'डॅशबोर्ड' कार्यान्वित करण्याची शिफारस मुंबई, दि. ६...

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.६: जिल्हाधिकारी यांनी मत्स्यव्यवसाय वृद्धिंगत करण्याकरिता धरती...