बारामती मतदारसंघातून काँग्रेस-रासप-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. आकाश विजयराव मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल.

Date:

पुणे-, दि. ६ एप्रिल २०२६
बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष वंचित बुहजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. आकाश विजयराव मोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, कार्याध्यक्ष लहू अण्णा निवंगुने, बारामती शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक इंगुले, सरचिटणीस राहुल वाबळे, कमलाकर सातव, गोविंद मिरगे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरधवल गाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोपणे, नगरसेवक अमोल सातकर, यांच्यासह काँग्रेस, रासप व वंचित आघाडीचे पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष निवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवेल अशी भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. त्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर व वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खा. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा केली होती. राष्ट्रीय समाज पक्षाने या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीही काँग्रेस सोबत आहे. काँग्रेस पक्षाने लढा लोकशाहीचा, मार्ग संविधानाचा या तत्वाने या पोटनिवडणुकीसाठी अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. ते व्यवसायाने वकील असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. त्यांचे वडील विजयराव मोरे हे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांनी केले कौतुक

मुंबई, दि. ०६ एप्रिल २०२६: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ...

वसईत जखमी बालकाची रुग्णालयांत फरफट; हलगर्जीपणावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

रुग्णालयांची माहिती देणारा 'डॅशबोर्ड' कार्यान्वित करण्याची शिफारस मुंबई, दि. ६...

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.६: जिल्हाधिकारी यांनी मत्स्यव्यवसाय वृद्धिंगत करण्याकरिता धरती...