पुणे- अमेरीकेत सुध्दा सर्वत्र डांबरीकरणाचाच उपयोग होतो.मग उष्णता वाढविणारे , भूजल पातळीवर परिणाम करणारे रस्त्यांच्या कॉंक्रीटीकारणाचा हट्ट का ? कशासाठी ? पुणं गेलं खड्ड्यात … अशी आरोळी मारून रस्तोरास्तीचे खड्डे डांबरीकरणाच्या माथी मारून कॉंक्रीटीकारणाचे हे फॅड 1997 साली आणलं गेलं . पूर्वीही पूर येत होता पण तो नदीला येत होता , पाटील इस्टेट झोपडपट्टी हि पूर्वी पुराचं ठरलेलं ठिकाण होतं जिथे अय्याज काझी आणि जे कोणी असतील ते महापौर वगैरे मान्यवर आणि पत्रकार छायाचित्रकार झोपडपट्टीत शिरलेल्या पाण्याची पाहणी करत , मग शाळांमध्ये तात्पुरते निवास , नुकसान भरपाई सारे सोपस्कार उरकले जात. पण १९९७ नंतर हे चित्र बदलत गेलं नदीला पूर येणारी ठिकाणे वाढली , आणि शहरात देखील पूरस्थिती आता निर्माण झाली . का कशामुळे झाले हे याचे उत्तर अगदी सोपे आहे त्यातले एक कारण आज भाजपचे माजी नगरसेवक जे सभागृहात आढाव , बापट , कुलकर्णी नंतर गाजत . प्राध्यापक विकास मठकरी … आज त्यांनी या साऱ्या आठवणी तीन एक वाक्यात ताज्या केल्या. आणि सध्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर रामयांचे अभिनंदन केले .
नेमके काय म्हटलेय मठकरी यांनी ते त्यांच्याच शब्दात …
नवलकिशोर राम
पुणे मनपा आयुक्त
नमस्कार..!!
तुमचे मनापासून खुप खुप अभिनंदन..!
सिमेंट नव्हे , डांबरी रस्ते हाच उपाय ..!
1997 साली सिमेंटच्या रस्ताचं फॅड निघाल होतं. परंतू मी तेव्हा सुद्धा GB मधे विरोध केला होता.
सुहास कुळकर्णी आणि उज्ज्वल केसकर सुध्दा माझ्या बाजूने लढले.
पण काल अचानक 2 एप्रिल ला प्रचंड पावूस झाला. अगदी 130 वर्षांत अभूतपुर्व ..!
सिमेंटचे रस्ते धोधोऽऽ वाहणाऱ्या नद्याच बनल्या. त्यामुळे घरामधे आणि पार्किंग एरियामधे पाणी शिरलं. कॅाक्रीटीकरणामुळे ते पाणी सोसायट्या मधेच अडकून बसलं.
परंतू आता निर्णय झाला. रस्ते काही प्रमाणात का होईना [ 9 मिटर पेक्षा लहान… ] पण डांबराचे होणार. सिमेंटची उष्णता तर काही महाभयानकच असते. आता ते ही काही प्रमाणात थांबणार.
अमेरीकेत सुध्दा सर्वत्र डांबरीकरणाचाच उपयोग होतो.
पण आता हे होणार हे शहाणपण..!
—— प्रा. विकास मठकरी.

