‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणार

Date:

अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण  डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी या कलाकारांची दमदार फळी एकत्र पहायला मिळणार आहे.

‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर थरारपट रसिकांसाठी आणला आहे.

‘सालबर्डी’ या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा. भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी  रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज’च्या नवीन कार्यालयाचे उदघाटन

केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले साहेबांकडून शैक्षणिक संस्थेचे कौतुकपुणे :...

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय- डॉ.नीलम गोऱ्हे

ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्यविषयक व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे निर्देश पुणे,...

मोठे मन दाखवण्याची मागणी काँग्रेसने फेटाळली:सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणारच; सपकाळ यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई-बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार...

डॉ.हुलगेश चलवादी यांची ‘आरपीआय’ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती 

राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री .रामदास आठवलेंच्या हस्ते सत्कार  पुणे:-रिपब्लिकन...