डॉ.हुलगेश चलवादी यांची ‘आरपीआय’ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती 

Date:

राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री .रामदास आठवलेंच्या हस्ते सत्कार 
पुणे:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी बहुजन नेते, पुण्याचे माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांची नियुक्ती केली. संघटनात्मक कौशल्य, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव तसेच लोकसंपर्क आणि बहुजन चळवळीतील सक्रिय सहभाग लक्षात घेत आठवले यांनी ही जबाबदारी डॉ.चलवादी यांच्या खांद्यावर टाकली आहे.

‘रेसिडेन्सी क्लब’येथे पक्षाची महाराष्ट्र प्रदेश वर्किग कमेटीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आठवले साहेबांनी राज्यातील जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करीत डॉ.चलवादी यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्तीची संघटनात्मक घोषणा केली.

तीन दशकांहून अधिकचा सामाजिक-राजकीय कार्याचा अनुभव असलेले डॉ.चलवादी यांनी २४ मार्च २०२६ रोजी आरपीआय पक्षात प्रवेश करीत आठवले यांच्या नेतृत्वात बहुजन चळवळीत काम करण्याचा निर्धार सोडला होता.पक्षाची प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पक्ष संघटनात्मक कामासह पक्ष विस्ताराचे कार्य प्रामुख्याने हाती घेवू, अशी भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

आठवले यांनी एवढी मोठी जबाबदारी देवून आपल्यावरील त्यांचा विश्वास दाखवून दिला आहे. हा विश्वास सार्थकी ठरवून बहुजन चळवळ आणखी व्यापक करीत आठवलेंच्या माध्यमातून वंचित-पीडित-शोषित-उपेक्षितांना न्याय मिळवून देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने सुरु ठेऊ, असे डॉ.चलवादी म्हणाले.

बैठकीत आठवले यांच्या सह महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश महासचिव गौतम सोनावणे, प्रदेश महिला अध्यक्ष चंद्रकला सोनकांबळे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे महापालिकेच्या गटनेत्या हिमालीताई कांबळे , नगरसेविका निशा मानवतकर , नगरसेविका अश्विनीताई भंडारी, पिंपरी-चिंचवड चे नगरसेवक धर्मा तंतरपाले ,नगरसेवक कुणाल वाव्हळकर , महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सचिव बाळासाहेब जानराव , माजी नगरसेवक जयदेव रंधवे पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील आजी-माजी नगरसेवक, प्रदेश कार्यकारिणी तील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय- डॉ.नीलम गोऱ्हे

ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्यविषयक व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे निर्देश पुणे,...

मोठे मन दाखवण्याची मागणी काँग्रेसने फेटाळली:सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणारच; सपकाळ यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई-बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार...

शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर

सुट्टीच्या दिवशीही महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत; सभागृह नेते...