शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर

Date:

  • सुट्टीच्या दिवशीही महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत; सभागृह नेते गणेश बिडकरांकडून अधिकाऱ्यांची बैठक

पुणे ४ एप्रिल: पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील पाणी साठणाऱ्या भागांची माहिती संकलित करून संबंधित विभागांना तत्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी नियोजन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

आज सुट्टीचा दिवस असतानाही महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आला आहे. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभाग मुख्य अभियंता जगदीश खानोरे, पथ विभागाचे राजेश बनकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने, नगरसेविका अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील पाणी साठणाऱ्या संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करत तात्काळ उपाययोजनांसोबतच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दीर्घकालीन नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल, यासाठी व्यापक योजना आखण्यावर भर देण्याची सूचना गणेश बिडकर यांनी केली आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया
“पुणे शहरात अतिवृष्टी झाल्यास कोणत्याही भागात पाणी साचू नये, यासाठी ड्रेनेज व्यवस्थेत आणखीन तात्काळ आणि दीर्घकालीन सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर ॲक्शन प्लॅन बनवण्याची सूचना केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या...

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ...

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी...