उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, त्याला आमचा पाठिंबा:शरद पवार

Date:

मुंबई-पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना साधताना शरद पवार म्हणाले, माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मोलाची मदत केली. आता विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील. कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने घेतला जाईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.शरद पवार यांच्या विधानामुळे ही एकमेव जागा आता ‘ठाकरे गटा’च्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. पुढील महिन्यात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने, ते स्वतः मैदानात उतरणार की एखाद्या निष्ठावान सहकाऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना खंबीर पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची शरद पवार ‘परतफेड’ करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. “विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल,” असा शब्द शरद पवार यांनी दिला आहे. या निर्णयामुळे विधानपरिषदेची महाविकास आघाडीची एकमेव जागा आता ‘ठाकरे गटा’च्या वाट्याला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू होती, मात्र शरद पवारांच्या भूमिकेमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. या एका जागेवरून आघाडीत ओढाताण सुरू असतानाच शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

विधान परिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

2029 चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई, देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान...

भाजपच्या बिनविरोध नीतीचा परिणाम:बारामतीत अपक्षांची झुंबड; उमेदवारांचे अर्धशतक

पुणे: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक पार पडत...

पुण्याअगोदर अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीए घालणार ‘हातोडा’; आयुक्तांचा अंतिम अल्टिमेटम!

विशेष मोहीम : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर याच आठवड्यात कारवाईचा...