प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांचा पुणे विभागीय आढावा

Date:

पुणे, दि. 3 – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) यांच्या अंमलबजावणीचा विभागीय आढावा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सर्किट हाऊस, पुणे येथे घेण्यात आला.

बैठकीस पुणे विभागाचे आरोग्य संचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हनकारे, योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. वैभव गायकवाड तसेच पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे उपस्थित होत्या.

बैठकीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व शासकीय रुग्णालयांनी अंगीकृत होऊन प्रत्येक पात्र रुग्णावर उपचार योजनेंतर्गतच करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी (PHC) योजनेंतर्गत २५ उपचार प्रक्रियांची तरतूद असून, त्या प्रक्रियांमध्ये बसणाऱ्या रुग्णांचे प्री-ऑथोरायझेशन योजनेच्या पोर्टलवरून पाठविल्यास संबंधित पीएचसीला क्लेम मिळणार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

योजनेतील २२३ ‘गव्हर्नमेंट रिझर्व्ह्ड’ प्रक्रियांतर्गत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांनी पात्र रुग्णांचे प्री-ऑथोरायझेशन करणे अनिवार्य असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

पुणे विभागातील सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांनी पुढील एका महिन्यात योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार सुरू करावेत, त्याचा आढावा महिन्यानंतर घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. योजनेंतर्गत उपचार न करणाऱ्या रुग्णालयांच्या नोडल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.

अंगीकृत खासगी रुग्णालयांविषयी तक्रारी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० किंवा त्याहून अधिक खाटांची रुग्णालये अंगीकृत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले.

पुणे विभागातील सर्व शासकीय रुग्णालये पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान करतील, असा विश्वास आरोग्य संचालक डॉ. भगवान पवार यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रेनेज विभागातील हजारो कोटींच्या खर्चाची चौकशी करा:महापौरांकडे नैमित्तिक समिती स्थापनेची भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

पुणे- महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद नवनियुक्त सदस्यांची बैठक

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार पुणे: पुणे जिल्हा...

भोंदू खरात प्रकरणात काही लोकांनी जीव दिले:मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा - ज्यांचा या प्रकरणात...