पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग विक्रीचे मोठे जाळे उत्तमनगर पोलिसांनी उघडकीस आणले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून हे रॅकेट समोर आले. पोलिसांनी आठ आरोपींना निष्पन्न केले आहे. आणि चौघांना अटक केली आहे .सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) आणि शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राठोड याच्याकडून दोन मेफेड्रॉनच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. त्याच्या बँक खात्यावर तब्बल दहा लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, ज्यात ८.१९ ग्रॅम एमडी आणि एक दुचाकीचा समावेश आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी सांगितले कि,’ किडनॅपिंग मधील WANTED आरोपी नामे सुनिल गोपाळ राठोड हा सिंहगड सृष्टी परिसरात येणार असले बाबत गोपनिय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिह क्षीरसागर यांना मिळाली होती या माहिती वरुन त्यांनी पोलीस उप निरीक्षक अक्षय पाटील व स्टाफ यांना सदर माहिती सांगितली असता त्यांनी सदर ठिकाणी सापळा लावून या आरोपीस ताब्यात घेतले त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीस उप निरीक्षक पाटील यांनी ती माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिह क्षीरसागर यांना कळवीली. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्टाफ व पंचासह गेले व आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये अंमली पदार्थाचे ३ ग्रॅम इतके मेफेड्रॉन (एम.डी.) व दोन मोबाईल मिळून आले आरोपीस चौकशी करिता उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे आणले असता त्यांचे मोबाईल तपासले असता आरोपी सुनिल राठोड याचे मोबाईलवर फोन पे व गुगल पे द्वारे प्रथमदर्शनी १० लाख रु पर्यंतचे व्यवहार मोबाईल वरुन केल्याचे दिसून आले. त्या बाबत त्याचे कडे चौकशी केली असता ६ ते ८ लोकांना ५.५ लाख रुपये दिल्याचे दिसून येत होते व जवळपास २५० ते ३०० जणांकडून पैसे अकाउंटला आल्याचे दिसून येत होत त्या बाबत विचारणा केली असता मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करिता १) शुभम संतोष दहिभाते २) राजन गोपाल नायर ३) जतीन जयंवत कदम, व इतर WANTED ४ आरोपी यांचे कडून विकत घेवून मागणी प्रमाणे पुढे विकल्याचे सांगितले वरिल आरोपीतांचे पूर्व रेकॉर्ड तपासले असता त्यांच्यावर पुणे शहरामधील विवीध पोलीस स्टेशन ला गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याचे निदर्शनास आले.
यातुन मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थाचे व्यवसायिक दृष्टी कोणातून संघटित पणे व बेकायदेशिर रॅकेट चालत असल्याचे निष्पन्न झाले आरोपी सुनिल राठोड व त्याच्या सहकाऱ्यांनी अंमलीपदार्थाचे केलेले व्यवहार हे व्यावसायिक दृष्टीने झाल्याचे दिसुन आले म्हणून पोलीस उप निरीक्षक अक्षय पाटील यांची सरकार तर्फे तक्रार घेवून उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने उत्तमनगर पोलीस स्टेशन कडून आरोपी शुभम संतोष दहिभाते रा. उत्तमनगर पुणे यास अटक करुन दिनांक १/०४/२०२६ रोजी त्याचे राहत्या घराची घरझडती मध्ये ५.१९ ग्रॅम इतके मेफेड्रॉन (एम.डी.) मिळून आले. तसेच गुन्हे शाखा पुणे शहर यांनी आरोपी ३) राजन गोपाल नायर रा. उत्तमनगर, पुणे ४) जतीन जयंवत कदम, रा वारजे, पुणे या दोन आरोपींना ताब्यात घेवून उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे पूढील तपासकामी आणून दिले आहे. सदर गुन्ह्यात एकून ८ आरोपी निष्पन्न असून त्यापैकी ४ आरोपी अटक करण्यात आले आहेत. न्यायलयाने गुन्ह्याची व्याप्ती पाहता अटक आरोपींना दिनांक ०८/०४/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिह क्षीरसागर उत्तनमनगर पोलीस स्टेशन हे करत आहेत. या गुन्ह्यात आत्ता पर्यंत एकून ८.१९ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) सह मोबाईल व वाहने असा एकून २,३६,५००/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार , पोलीस सह. आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे , अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख , पोलीस उप-आयुक्त , परिमंडळ ३ संभाजी कदम,पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे ,सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर तसेच उत्तमनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप-निरीक्षक चेतन धनवडे, पोलीस उप निरीक्षक अक्षय पाटील, पोलीस उप निरीक्ष मुकेश कुरेवाड, पोलीस हवालदार प्रदीप शेलार, पुथ्वीराज गायकवाड, पोलीस शिपाई चेतन बराटे, परमेश्वर पाडळे, ज्ञानेश्वर तोडकर, अनिरुध्द गायकवाड यांचे पथकाने केली आहे.

