पुणे-
भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम) यांनी आज पुण्यात दोन कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान भूषवले. सेठ यांनी पुणे लष्करी तळावर ‘सुदर्शन चौक’ आणि ‘कोणार्क चौक’ यांचे उद्घाटन केले; तसेच ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग’ इथे त्यांनी एका अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यत मार्गाचे उद्घाटनही केले.सुदर्शन आणि कोणार्क चौकांचे उद्घाटन: लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी ‘दक्षिण विभागाच्या पराक्रमी तुकड्या—’सुदर्शन चक्र काॅर्प्स’ आणि ‘कोणार्क काॅर्प्स’—यांचे शौर्य, उत्कृष्ट सेवा आणि लढाऊ वृत्तीला आदरांजली म्हणून ‘सुदर्शन चौक’ आणि ‘कोणार्क चौक’ यांचे उद्घाटन केले. पुणे लष्करी स्टेशनच्या प्रतिष्ठित परिसरात वसलेल्या या दोन्ही वास्तू देशातील सर्वात जुन्या लष्करी ठाण्यांपैकी एक असलेल्या पुण्याच्या समृद्ध आणि वैभवशाली इतिहासात लष्करी कर्तृत्वाची भर घालणाऱ्या ठरल्या आहेत.
दक्षिण विभागाच्या लष्करी कर्तृत्वाच्या वारशा मोठे योगदान देणाऱ्या या दोन्ही वास्तू, दलांच्या जिवंत मूल्यांचेही प्रतिनिधित्व करतात. त्यांची स्थापना, पराक्रमाच्या स्मृती जतन करणे, अभिमान जागृत करणे आणि तिच्या युद्ध-अनुभवी दलांच्या वारशात कमांडची विद्यमान ओळख दृश्यरूपात स्थापित करणे या जाणीवपूर्वक केलेल्या संस्थात्मक प्रयत्नांचे द्योतक आहे.
EVK7.jpg)
0G9K.jpg)
लष्कराच्या शारीरिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यतमार्गाचे उद्घाटन : लष्कर कमांडरांनी अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यतमार्गाचे उद्घाटन केले. अधिक तंदुरुस्त, कणखर आणि युद्धसज्ज सैन्यदल तयार करण्याच्या सदर्न कमांडच्या निरंतर प्रयत्नांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
बारमाही काळात सुरू राहणाऱ्या या अडथळा शर्यतमार्गावर विविध परिस्थितींमध्ये वास्तववादी, उच्च-तीव्रतेचे आणि दीर्घकाळ टिकणारे शारीरिक प्रशिक्षण सुलभ व्हावे, यादृष्टीने काळजीपूर्वक केलेले अडथळे आणि रात्रीच्या प्रशिक्षणाची क्षमता यांचा समावेश आहे.युद्धाच्या बदलत्या स्वरूपामुळे शारीरिकदृष्ट्या कणखर, मानसिकदृष्ट्या चपळ आणि कारवाईत जुळवून घेणाऱ्या सैनिकांची आवश्यकता आहे, यावर सेठ यांनी आपल्या भाषणात भर दिला. अशा प्रकारच्या विशेष प्रशिक्षण पायाभूत सुविधा एक कणखर, चपळ आणि भविष्यासाठी सज्ज सैन्यदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या कार्यक्रमांतून लष्करी वारसा जतन करण्याप्रती आणि भविष्यातील युद्धसज्जता वाढवण्याप्रती दक्षिण विभागाची कटिबद्धता अधोरेखित झाली.

