‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

Date:

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’, ‘जोग बहार’, ‘मालकंस’, ‘जोग’ आदी सायंकालीन व रात्रौकालीन रागांचा आनंद रसिकांना सकाळच्या प्रहरात अनुभवायला मिळाला. कालप्रहराचे बंधन न स्वीकारता झालेले सादरीकरण रसिकांनी सहजतेने स्वीकारत त्यांचा आनंद घेत उपक्रमाला भरभरून दाद दिली.

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ रागप्रभा या संगीतोत्सव व परिसंवादाचे आयोजन रविवारी (दि. २९) बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात पद्श्री पंडित व्यंकटेशकुमार, पद्मश्री पंडित रोणु मजुमदार, पंडित आनंद भाटे तसेच पद्मभूषण पंडित साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा यांचे सादरीकरण झाले.

संगीतोत्सवाचे उद्‌घाटन पंडित अरुण कशाळकर, पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक वळसंगकर, विश्वस्त डॉ. रघुवीर कुलकर्णी, ॲड. अनिरुद्ध वळसंगकर, कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे मंचावर होते.

बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य : पंडित अरुण कशाळकर…

उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना पंडित अरुण कशाळकर म्हणाले, सांगीतिक क्षेत्रात परंपरा कितीही घट्ट असल्यातरी कालानुरूप त्यात बदल होत असतात. हे बदल होणे म्हणजेच कला जीवंत असण्याचे लक्षण होय. बदलांची प्रक्रिया सातत्याने घडत असते आणि या बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य मिळते. बदलाची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणे आवश्यक असून त्या करिता विचारांचे अदानप्रदान होणे गरजेचे आहे. कलाकार या बदलातून कलेला एक दिशा देण्याचे कार्य करीत असतात. हे रुजलेले बदल परंपरा रूपाने पुढे येत जातात.

पंडित व्यंकटेशकुमार म्हणाले, ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ ही अभिवन संकल्पना राबविणारे पुणे हे पहिले शहर आहे, याचे कौतुक वाटते.

संगीतोत्सवाची सुरुवात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने झाली. त्यांनी सायंकालीन राग म्हणून प्रचलित असलेला राग मारवा सादर करून त्यानंतर राग केदारची झलक दर्शविली. सायंकाळी व्याकुळ करणाऱ्या स्वरांची जादू रसिकांना सकाळच्या प्रहरातही मोहित करून गेली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), शिवराज पाटील, नागराज नागेश (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.

या नंतर पंडित रोणु मजुमदार यांचे बासरीवादन रंगले. त्यांनी रात्रीच्या पहिल्या प्रहरात सादर होणारा राग बिहाग अतिशय तरलतेने साकारला. कुठलाही राग कुठल्याही वेळी प्रभाव पाडू शकतो या प्रभाताईंच्या विचाराला समर्पक असे हे सादरीकरण रंगले. यानंतर त्यांनी मैहर घराण्याचे वैशिष्ट्य दर्शवत राग जोगबहार या जोड रागाची झलक ऐकविली. त्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडित रामदास पळसुले (तबला), कल्पेश माचला (बासरी सहवादन) यांनी रंगतदार साथ केली.

पंडित आनंद भाटे यांनी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा राग मालकंस ऐकवून रसिकांना संमोहित केले. त्यानंतर राग बसंत मल्हारमधील सुमधुर रचना सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), स्वप्नील गायकवाड, ललित देशपांडे (तानपुरा) यांनी साथ केली.

सकाळच्या सत्राची सांगता बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित साजन मिश्रा व त्यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायनाने झाली. त्यांनी जोग रागाचे मनमोहक दर्शन घडवत रसिकांना अनोखा आनंद दिला. प्रभा अत्रे या फक्त गायिकाच नव्हे तर एक महान चिंतक होत्या, असे सांगून रागप्रहराच्या पलिकडे जाऊन केलेले सादरीकरण हे त्यांच्या संकल्पनेला अनुरूप असल्याचे पंडित साजन मिश्रा म्हणाले. चारूकेशी रागातील गुरूंचे महात्म्य सांगणाऱ्या बंदिशीने त्यांनी मैफलीची सांगता केली. स्वरांश मिश्रा यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. राहुल गोळे (संवादिनी), सौरभ गुळवणी (तबला), निषाद व्यास, अथर्व वैरागकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा:3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स...

धायरी येथील बेनकरनगर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे पाणी, मैलापाणी चेंबर, वाहिन्यांंचा चुराडा

वाहतूक बंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन पुणे:धायरी येथील बेनकरनगर...

पीएमपी वाहकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग:सहकारनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुणे-पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका...