धायरी येथील बेनकरनगर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे पाणी, मैलापाणी चेंबर, वाहिन्यांंचा चुराडा

Date:

वाहतूक बंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन

पुणे:
धायरी येथील बेनकरनगर मधील सर्व्ह क्रमांक पाच मध्ये रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक पर्यायी रस्त्याला वळविण्यात आली आहे. ‌ या अरुंद रस्त्यावर दगड खडी क्रेशंड अशी वाहतूक करणाऱ्या अवजड डंपर, ट्रकमुळे जलवाहिन्या, मैलापाणी वाहिन्या आणि चेंबरची चुराडा झाला आहे. रस्त्यावर मैलापाणी वाहत आहे.त्यामुळे हजारो नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.
अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, अपघातही वाढले आहे. वाहतूक विभाग, पालिका
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना कोणी वाली उरला नाही.
पाणी पुरवठा, मैलापाणी चेंबरचा चुराडा करणाऱ्या,
वाहतूक कोंडी, अपघातास जबाबदार असलेल्या सर्व प्रकारच्या ट्रक, डंपर आदी अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्याचा निर्धार संतप्त नागरिकांनी केला आहे.
या बाबत आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, बेनकर येथिल मुख्य रस्त्याचे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे. अत्यंत अरुंद व दाट लोकवस्त्या , सोसायट्या मोठे जाळे या ठिकाणी आहे. वाहतूक वळविण्यात आली असली तरी अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील मैलापाणी , जलवाहिन्यांची चेंबर तुटून धो धो पाणी वाहत आहे. मैलापाणी घरात शिरत आहे.‌सोसायट्या, घराच्या दारात मैलापाणी, सांडपाण्याची तळी साठली. दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने अवजड वाहनांना पर्यायी रस्त्याने ये जा करण्यास बंदी घालण्यात यावी.
स्थानिक रहिवाशांसह विद्यार्थी , महिला, जेष्ठ नागरिक आदींना पर्यायी रस्त्याने चालणेही धोकादायक झाले आहे. डंपर ट्रकच्या धडकेत माणसे, मुले जखमी होत आहेत. त्यामुळे मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. दुकानदार, छोटे व्यावसायिक आदींना दुकाने उघडपणे धोकादायक झाले आहे.‌ डंपर ट्रक थेट दुकानात शिरत आहे. या पर्यायी अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांमुळे रिक्षा , दुचाकी, मीनी स्कूल बस आदी वाहने अडकुन पडत आहेत. समोरासमोर वाहनांना ये जा करत येत नाही या गंभीर समस्येकडे आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर व रहिवाशांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा:3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स...

पीएमपी वाहकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग:सहकारनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुणे-पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका...

पुणे विमानतळ देशात अव्वल,सेवा गुणवत्तेत प्रथम क्रमांक

पुणे: देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता...

पुणे विमानतळावर वाढलेल्या स्मगलिंग चा पर्दाफाश:सीमाशुल्क विभागाने २७ कोटीचा गांजा पकडला,

थायलंडहून संत्र्यांच्या पिशव्यांमध्ये आला 76.58 किलो गांजा पुणे-पुणे...