पीएमपी वाहकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग:सहकारनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक

Date:

पुणे-पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या वाहकाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.पीडित युवतीच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी शेखविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. आरोपी शेख हा त्याच बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होता. प्रवासादरम्यान त्याने युवतीला त्याचा मोबाइल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला.युवतीने त्याचा प्रयत्न हाणून पाडत नकार दिल्यानंतर, आरोपी शेखने तिला स्पर्श करून विनयभंग केला. या प्रकारानंतर युवतीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून इतर प्रवाशांनी बस थांबवली आणि वाहक शेखला पकडले.
प्रवाशांनी युवतीकडे विचारणा केली असता, वाहक शेखने तिचा विनयभंग केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रवाशांनी शेखला पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलिस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या आणखी एका घटनेत, एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असून, तो हिंगणे खुर्द परिसरातील एका सोसायटीत राहतो. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार महिलेच्या मुलीला आरोपीने वाईट पद्धतीने स्पर्श केला होता. मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर, आईने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक माधुरी काजळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धायरी येथील बेनकरनगर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे पाणी, मैलापाणी चेंबर, वाहिन्यांंचा चुराडा

वाहतूक बंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन पुणे:धायरी येथील बेनकरनगर...

पुणे विमानतळ देशात अव्वल,सेवा गुणवत्तेत प्रथम क्रमांक

पुणे: देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता...

पुणे विमानतळावर वाढलेल्या स्मगलिंग चा पर्दाफाश:सीमाशुल्क विभागाने २७ कोटीचा गांजा पकडला,

थायलंडहून संत्र्यांच्या पिशव्यांमध्ये आला 76.58 किलो गांजा पुणे-पुणे...