पुणे विमानतळावर वाढलेल्या स्मगलिंग चा पर्दाफाश:सीमाशुल्क विभागाने २७ कोटीचा गांजा पकडला,

Date:

थायलंडहून संत्र्यांच्या पिशव्यांमध्ये आला 76.58 किलो गांजा
पुणे-पुणे सीमाशुल्क विभाग यांनी मोठी कारवाई करत सुमारे 26.80 कोटी रुपये किमतीचा 76.58 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो विभागात करण्यात आली.थायलंडहून आलेली आयात वस्तू मध्ये ‘मँडरीन संत्र्याच्या पिशव्या’ म्हणून घोषित करण्यात आली होती. हा माल पांढऱ्या थर्मोकोलच्या खोक्यांमध्ये पॅकिंग करण्यात आला होता. स्कॅनिंगदरम्यान प्रतिमा संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी एक खोका उघडून तपासणी केली.

तपासणीदरम्यान सीलबंद टिनचे डबे आढळले. त्यामध्ये मिठासारखी पांढरी दाणेदार पावडर दिसून आली. पुढील तपासात त्या पावडरमध्ये लपवलेले व्हॅक्यूम सील प्लास्टिक पॅक सापडले, ज्यामध्ये हायड्रोपोनिक गांजा ठेवण्यात आला होता.

यानंतर संपूर्ण खोकी तपासण्यात आली आणि एकूण 76.58 किलो गांजा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत भारतीय अवैध बाजारात सुमारे 23.80 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले.सीमाशुल्क विभागाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली असून आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हायड्रोपोनिक गांजा म्हणजे मातीशिवाय पाण्यात आणि विशेष पोषक द्रव्यांच्या सहाय्याने उगवलेला कॅनॅबिस होय. या आधुनिक शेती पद्धतीला हायड्रोपोनिक्स असे म्हटले जाते. या तंत्रामध्ये तापमान, प्रकाश, आर्द्रता आणि पोषक द्रव्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवून वनस्पतींची वाढ केली जाते, त्यामुळे तयार होणारा गांजा अधिक दर्जेदार आणि प्रभावी मानला जातो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा:3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स...

धायरी येथील बेनकरनगर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे पाणी, मैलापाणी चेंबर, वाहिन्यांंचा चुराडा

वाहतूक बंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन पुणे:धायरी येथील बेनकरनगर...

पीएमपी वाहकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग:सहकारनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुणे-पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका...

पुणे विमानतळ देशात अव्वल,सेवा गुणवत्तेत प्रथम क्रमांक

पुणे: देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता...