पुणे : कसबा पेठेतील श्रीराम चव्हाण मंदिरातर्फे श्रीराम नवमीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा श्रीराम कर्तव्यपूर्ती पुरस्कराने गौरव करण्यात आला. मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रसाद बर्गे, माजी महापौर अंकुश काकडे, गौरी गणेश बिडकर, अप्पासाहेब गायकवाड, नगरसेवक देवेंद्र वडके, दत्ताभाऊ सागरे, संयोजक गणेश चव्हाण, भोला वांजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण परिवार, श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट, चक्रवर्ती अशोक मंडळ ट्रस्ट यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वंचित मुलांसाठी कार्य करणाऱ्या डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे, वृक्षारोपणाचे कार्य करणारे राज देशमुख, महिला, मुलींचे पुनर्वसन करणाऱ्या शिला शेट्टी, समाजसेवक दिनेश शहा, सामाजिक कार्यकर्त्या वनिता अंबिके, संध्या गायकवाड, सारिका अगज्ञान, ॲड. परेश खाडिलकर यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सामाजिक कार्यातील योगदानासाठी म्हणून अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रास्ताविकात गणेश चव्हाण म्हणाले, प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रसेवा आणि समाजसेवेत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी श्रीराम कर्तव्यपूर्वी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.
मान्यवरांचे स्वागत राहुल पारखी, रणजीत चौधरी, भारती चव्हाण, देवेंद्र वडके, दिलीप मोरे, हर्षल परदेशी, राजेश जोशी, दत्ताभाऊ सागरे यांनी केला.

