PMPML भ्रष्ट, गैरकारभार: मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी सीएमडी देवरेंच्या कार्यकाळातील कामकाजाची “श्वेतपत्रिका” काढा: उज्वल केसकर

Date:

पुणे-PMPML मधील भ्रष्ट, गैरकारभाराच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी सीएमडी देवरेंच्या कार्यकाळातील कामकाजाची “श्वेतपत्रिका” काढा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर तसेच सुहास यांनी केली आहे.

केसकर म्हणाले,’ पीएमपीएमएल मधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले यांनी आपल्या पदाचा राजीनामा टपालातून दिल्याचे आम्हाला कळाले.पीएमपी गैरव्यवहारातली वसुली पथकातील “”पहिली विकेट”” पडली.हे महाशय राज्य सरकारच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर पीएमपी मध्ये आले होते.तत्कालीन अध्यक्ष यांनी त्यांना साधा ठराव करून नियुक्त केले होते.
बढत्या, बसेस भाड्याने घेणे, Arbitration इत्यादी सर्व विषयांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमी होते ऑडिओ क्लिप मध्ये देखील त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला ऐकला आहे.त्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या सेवकांनी व्यवहार केले होते त्यांचे व्यवहार पूर्ण होणार नाहीत असे दिसते.
संस्थेच्या नुकसान करून सहज यांचा राजीनामा स्वीकारू नये यांची जबाबदारी निश्चित करून प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, पेन्शन इत्यादी ज्या गोष्टी थांबवता येणं शक्य आहे त्या थांबवाव्यात, जबाबदारी निश्चित करावी.
मुख्य सूत्रधारांच्या पर्यंत देखील जाणे गरजेचे आहे कारण गरीब सामान्य कामगाराने जीवनाची सर्व पुंजी वसुली पथकाला दिली होती वसुली पथकातील इतर अधिकाऱ्याने देखील आता त्यांच्या “”आका””कडे जे पोचवले आहे ते “”आका”” कडून घेऊन द्यावे.
हा सगळा व्यवहाराचा पर्दाफाश जेव्हा आम्ही करायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यात काही होणार नाही.
आता घडायला सुरुवात झालेली आहे.
राज्य सरकारकडे जो अहवाल आहे तीन सदस्य समितीचा त्यावर कार्यवाही करावी अशी विनंती आहे माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना करणार आहोत.वेळ मध्ये कार्यवाही झाली नाही तर लोकायुक्त/ हायकोर्टामध्ये जाऊन दाद देखील मागणार आहोत.
सीएमडी श्री देवरे यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याबाबत पीएमपीने एक “श्वेतपत्रिका” काढावी अशी आमची मागणी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेस पक्षाची सोमवार ३० मार्चला सुरतगाव ते तुळजापूर ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’

मुंबई, दि. २८ मार्च २०२६ काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी...

भोंदू बाबा ऋषीकेश वैद्यला अटक

पुणे पोलिसांनी पिंपरीत ठोकल्या बेड्या; ‘मी शंकर, तू पार्वती’...

पुणे पोलिस भरतीत 1600 मीटर धावताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे-पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 23 वर्षीय...