पुणे पोलिस भरतीत 1600 मीटर धावताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Date:

पुणे-पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर मैदानावर शनिवारी (दि. 28) सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना तिसऱ्या फेरीत त्याला अचानक ‘फिट’ आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुरुषोत्तम बारकुल (23, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलिसांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शनिवारी सकाळी पुरुषोत्तम याची मैदानी चाचणी सुरू होती. पोलिस भरतीतील अत्यंत कठीण टप्पा मानल्या जाणाऱ्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत तो सहभागी झाला होता.

दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर, तिसऱ्या फेरीदरम्यान पुरुषोत्तमला अचानक ‘फिट’ (झटका) आली आणि तो धावता धावता मैदानावरच कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मैदानावरील इतर उमेदवार आणि पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. पुरुषोत्तम कोसळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके अत्यंत मंदावले असल्याचे निदर्शनास आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. अचानक तरुणाचा भरती दरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पुरुषोत्तमच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्याच्या गावावर शोककळा पसरली असून, पोलिस दलातही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खरातसारख्या माणसाला कोणी पोसलं?:16 वर्षांपासून भोंदूकडून महिलांच्या शोषणाचे प्रकार

पुणे-खरात प्रकरणी आर्थिक गोष्टीचा तपास करण्यात यावा अशी मागणी...

पुण्यात इफ्तारवेळी मुस्लिम तरुणांवर हल्ला; आठ आरोपी अटकेत

पुणे, : पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाट परिसरात इफ्तारच्या...