खरातसारख्या माणसाला कोणी पोसलं?:16 वर्षांपासून भोंदूकडून महिलांच्या शोषणाचे प्रकार

Date:

पुणे-खरात प्रकरणी आर्थिक गोष्टीचा तपास करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. चाकणकर यांचा आयोगाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा एकाच वेळी होऊ शकला असता. आयोगाच्या राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी द्यायला सांगितला त्यामध्ये काही तटकरेंचा रोल नव्हता. आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा काही राजीनामा नाही ही गच्छंती आहे,असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनी राजीनामा घेतला आहे, ते पक्षातील नाराजी ओळखत घेतला आहे. चाकणकर यांच्यावर आरोपपत्र दाखल होईल असे वाटते. एसआयटीवर विश्वास ठेवायला हवा.सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरात प्रकरणी पोलिस तपास करतील त्या तपासाकडे आमचे लक्ष राहील. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांची या प्रकरणी का चौकशी व्हावी याबद्दल माहिती आम्ही एसआयटी प्रमुखांना दिली आहे. चाकणकर यांचा राजीनामा ही आमची मागणी नाहीच. त्यांना पदावर असताना अटक झाली तर पक्षाची प्रतिमा डागाळेल. त्यांच्या राजीनाम्यासाठी मी नाही तर त्यांच्या पक्षातीलच लोकं आग्रही होते.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरातकडून 16 वर्षांपासून महिलांचे शोषण सुरू आहे. यात किती केसेस असतील? हजारो केसेस या प्रकरणी असू शकतात. चाकणकर आणि खरात याचा 12 ते 13 वर्षांपासून संपर्क आहे. खरातला मोठे करणारी लोकं कोण आहेत, तर दीपक केसरकर यांचा मी उल्लेख केला ते शालेय शिक्षणमंत्री? ते एमआयडीसीच्या मैदानावर काय करत होते. आवारे नावाचा माणूस जो जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे त्या पतसंस्थेमध्ये खरातचे आर्थिक व्यवहार असू शकतो त्या आवारेंची चौकशी झाली पाहिजे. खरातसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात इफ्तारवेळी मुस्लिम तरुणांवर हल्ला; आठ आरोपी अटकेत

पुणे, : पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाट परिसरात इफ्तारच्या...

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार: विश्वास पाठक

मुंबई, 27 मार्च 2026 महावितरणतर्फे राज्यात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या संदर्भात...

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट

तेलाच्या दरवाढीच्या धक्क्यापासून, ग्राहक आणि तेल विपणन कंपन्यांचे संरक्षण...