चंद्रपूरच्या मथुराताई पुनर्वसन प्रकरणाचा आढावा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

Date:

मुंबई, दि. २७ मार्च २०२६ : नवरगाव (जि. चंद्रपूर) येथील मथुराताई यांच्या पुनर्वसन प्रकरणाचा आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर आढावा घेतला. ११ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासनाला दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी समाधानकारकपणे सुरू असल्याचे दिसून आले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची प्रगती झाली आहे. घरकुल योजनेअंतर्गत घराचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून सध्या प्लास्टरचे काम सुरू आहे. अंत्योदय योजनेद्वारे कुटुंबाला नियमित रेशन मिळत आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) चौकीदार म्हणून नोकरी देण्यात आली असून, आर्थिक स्थैर्यासाठी १० लाख रुपयांपैकी ७ लाख रुपयांची मुदत ठेव (FD) सुपूर्द करण्यात आली आहे.

डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने निवारा, रोजगार आणि आर्थिक मदत या तिन्ही स्तरांवर समन्वित कार्यवाही केली आहे.

ग्रामसेवक व स्थानिक प्रशासनामार्फत योजनांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. दरम्यान, उर्वरित बाबींबाबत उपसभापतींनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

आर्थिक मदतीतील शिल्लक ३ लाख रुपयांची रक्कम तत्काळ वितरित करावी, घराचे उर्वरित २० टक्के बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करून कुटुंबाला लवकरात लवकर घर हस्तांतरित करावे, तसेच आरोग्य, रोजगार व उपजीविका या सर्व बाबींचा समावेश असलेली सर्वसमावेशक पुनर्वसन योजना राबवावी, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, कार्यवाहीचा नियमित प्रगती अहवाल उपसभापती कार्यालयाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मथुरा ताई यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाला गती मिळाली आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केशवनगर पाणीपुरवठा योजनेला गती ;१३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली माहिती पुणे : महापालिकेच्या हद्दीत...

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या...

मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा,कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवा

पुणे- एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे शुल्क बंद करावे, मराठी भाषा...