मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा,कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवा

Date:

पुणे- एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे शुल्क बंद करावे, मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवावे, भ्रष्टाचारांची चौकशी करून कारवाई करावी या या मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विद्यार्थी प्रश्नाबाबत युवा सेना, एन एस यु वाय, सम्यक विद्यार्थी आंदोलन, छात्र भारती, आझाद समाज पक्ष व इतर समविचारी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले.विद्यापीठाच्या आधीसभेचे कामकाज सुरू असताना हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये युवासेनेचे राम थरकुडे, युवराज पारेख, परेश खांडके, वैभव दिघे , सोहम जाधव, प्रथमेश भुकन व आदी पदाधिकारी सहभागी होते. याचबरोबर छात्रभारतीचे अनिकेत घुले, सौरभ शिंपी  उपस्थित होते. प्रज्योत गायकवाड व इतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते. आझाद समाज पार्टीचे सुलतान शहा, नॅशनल स्टूडेंट्स युनियन ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे, महासचिव शीतल उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांभुळकर, जिल्हा महासचिव रविराज कांबळे, सुशांत दसाडे, संदीप गायकवाड, शकील शेख, विकास अवचार व आदी कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अधिसभा सदस्य वायदंडे, पालवे तसेच परीक्षा विभागाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी आंदोलकांशी संवाद साधला.

दहा दिवसात या मागण्या मार्गी लावण्याचे पत्र प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी दिले.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर “कमवा आणि शिका” योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जाणारे मानधन ₹५५ वरून ₹८० प्रति तास करण्यात यावे, अशी मागणी युवासेना, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) तसेच समविचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

— सागर साळुंखे, प्रदेशाध्यक्ष, NSUI

विद्यापीठातील काही सिनेट सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कमिशनखोरी, टेंडरिंग प्रक्रिया आणि मक्तेदारीवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पुरेसा वेळ नसल्याचेही नमूद करण्यात आले.

— राम थरकुडे, शहर प्रमुख, युवासेना

एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा निषेध नोंदवण्यात आला असून, येत्या दहा दिवसांत हे कोर्स बंद न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

— अनिकेत घुले, प्रदेशाध्यक्ष, छात्रभारती

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या...

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे, दि.27: हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त...

राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

अभंग-गवळणींच्या सुरांनी जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात रंगली भक्तीमय मैफल पुणे...