श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Date:

पुणे, दि.27: हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने शिवभक्तांसाठी ‘शिववंदना’ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर, ता. भोर येथे आयोजित करण्यात आला.यामध्ये शाहिरी-गायन-वादन सादरीकरणही करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तमी’ १६४५ ला मावळ्यांसह परकीय राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, या घटनेला ३८१ वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभुमीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात रायरेश्वर भूमीचा समग्र शाश्वत विकास, केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत व महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘स्वराज्य सर्किट’ (किंवा शिव स्वराज्य सर्किट) मध्ये श्री क्षेत्र रायरेश्वर प्रेरणाभूमीचा समावेश व हिंदवी स्वराज्य स्तंभ श्री क्षेत्र रायरेश्वर येथे उभारण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केली. स्वराज्याचा कुंभमेळा अधिक शासकीय माध्यमातून आणि व्यापक लोकसहभागातून साजरा करण्याच्या निर्धार केला. भारताच्या-राज्याच्या विविध मंत्री महोदयांनी या सोहळ्याला, अभियानाला दिलेल्या शुभेच्छा व पाठीब्याचे वाचन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त शाहिरी-गायन-वादन सादरीकरणाचा शिव वंदना हा विशेष कार्यक्रम साजरा झाला. या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था- रायरेश्वर, बायोस्फिअर्स संस्था, ग्रामपंचायत रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. मोहन वामन, डॉ. सचिन अनिल पुणेकर, युवराज जेधे, मारुती आबा गोळे, दत्तात्रय जंगम, मौनीबाबा महाराज, रवींद्र कंक, प्रदीप मरळ, मंगेश शिळीमकर, सुनील चिकणे, राहुल पापळ, रवींद्र जंगम, सचिन देशमुख, रोहन इंगवले, अमित घरत यांच्या उपस्थितीत उपक्रम संपन्न झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या...

मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा,कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवा

पुणे- एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे शुल्क बंद करावे, मराठी भाषा...

राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

अभंग-गवळणींच्या सुरांनी जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात रंगली भक्तीमय मैफल पुणे...