डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहातच साजरी झाली पाहिजे -महापौर मंजुषा नागपुरे यांचे आदेश

Date:

पुणे, दि. २७ मार्च २०२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त आवश्यक नियोजनाबाबत पुणे महापौर दालनात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मिरवणूक मार्गाचे वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था, अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक व कार्डियाक अॅम्ब्युलन्सची नियुक्ती, विद्युत रोषणाई, अग्निशमन व्यवस्था, महापालिका सुरक्षा, मोबाईल टॉयलेट, मंडप, स्टेज, टेबल-खुर्ची तसेच मदत कक्ष उभारणी यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय सम्राट अशोक स्तंभाची देखभाल व दुरुस्ती, तसेच दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी आणि डी.पी. रोड, औंध येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याचे नूतनीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या नियोजनानुसार ३० मार्च रोजी विश्रांतवाडी येथे आणि ३१ मार्च रोजी पुणे स्टेशन परिसरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे पुढील बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकीत महापौर सौ. मंजुषा नागपूरे व उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी प्रशासनाला सर्व नियोजन काटेकोरपणे अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस ,निलेश आल्हाट,सभासद,पुणे महानगरपालिका, ओमप्रकाश दिवटे ,अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), हिम्मत जाधव, डी.सी.पी. ट्राफिक,पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (बंडगार्डन,पुणे), श्रीमती संगीता देसाडला,कार्यकारी अभियंता ,भवन विभाग, धनंजय पिंगळे, ट्राफिक विभाग,श्रीमती आशा राऊत,उपायुक्त ,सुरक्षा विभाग, माधव जगताप, उपायुक्त झोन क्र.०१ , रवी पवार उपायुक्त कर आकारणी कर संकलन विभाग, डॉ. अशोक घोरपडे सह महापलिका आयुक्त उद्यान विभाग, सोमनाथ बनकर, उपायुक्त अतिक्रमण विभाग, अविनाश सकपाळ, उपायुक्त घनकचरा विभाग, वसुंधरा बारवे उपायुक्त शिक्षण विभाग,बिपीन शिंदे पुणे मुख्य अभियंता भवन विभाग, नंदकिशोर जगताप मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग, हांडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती संगीता जाधव, पोलिस निरीक्षक येरवडा वाहतूक श्रीमती निशिगंधा शिंगे, येरवडा वाहतूक विभाग, संदीप माढाले, फरासखाना विभाग,कुणाल धुमाळ, रमेश शेळके, राकेश विटकर सुरक्षा अधिकारी, प्रमोद उंडे कार्यकारी अभियंता विद्युत विभाग,सुनिल यादव कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, सहायक आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल आंधळे,श्रीमती प्रज्ञा पवार सहा.महापालिका आयुक्त विजय भिलारे सहायक विभागीय अधिकारी अग्निशामक विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या...

मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा,कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवा

पुणे- एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे शुल्क बंद करावे, मराठी भाषा...

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे, दि.27: हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त...

राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

अभंग-गवळणींच्या सुरांनी जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात रंगली भक्तीमय मैफल पुणे...