राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

Date:

अभंग-गवळणींच्या सुरांनी जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात रंगली भक्तीमय मैफल

पुणे : ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’….‘घेई छंद मकरंद’,‘सावळा नंदाचा मूळ खोटा गे’  या अभंग, गवळणी आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या सुरेल सादरीकरणाने ‘सद्गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ भक्तिमय वातावरणात रंगला. राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या गायन सेवेमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात राजीव बर्वे व प्रियांका बर्वे यांनी गायन सेवा दिली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रियंका बर्वे यांनी हंसध्वनी रागातील गणपती स्तवनाने केली. त्यानंतर राजीव बर्वे यांनी सादर केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ या अभंगाने वातावरण प्रसन्न झाले. पुढे संत तुकाराम महाराजांचे ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’, ‘मी माझा हरपून बसले गं’, ‘ध्यान करू जाता मन हरपले’, ‘घेई छंद मकरंद’ या अभंगांनी श्रोत्यांना भक्तिरसाचा आनंद दिला.

संत नामदेवांच्या रचनेवर आधारित व श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ‘विठ्ठला आवडी प्रेम भाव’ या सादरीकरणालाही विशेष दाद मिळाली. प्रियंका बर्वे यांनी सादर केलेली ‘सावळा नंदाचा मूळ खोटा गे’ ही गवळण टाळ्यांच्या गजरात रंगली. श्रोत्यांना तल्लीन करणाऱ्या ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

 कार्यक्रमासाठी धनंजय वसवे (ढोलकी), आदित्य आठल्ये (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), अनय गाडगीळ (सिंथेसायझर) व राजेंद्र साळुंखे (तालवाद्य) यांनी उत्कृष्ट साथ-संगत केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या...

मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा,कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवा

पुणे- एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे शुल्क बंद करावे, मराठी भाषा...

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे, दि.27: हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त...