शासन व्यवस्थेचा अंकुश न राहिल्यानेच भोंदूगिरीचे प्रस्थ वाढले-गोपाळदादा तिवारी

Date:

पुरोगामी महाराष्ट्रात, ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ काँग्रेस ने केला.. मात्र त्यास प्रभावहीन करण्याचे काम फडणवीस सरकार काळात झाले…!

काँग्रेसची प्रखर टीका..!

पुणे : राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेने’ म्हंटल्या प्रमाणे मानवी वर्तन व निर्णय प्रक्रियेत वैचारिक तर्क लावण्याचे प्रयत्न केले जात नाहीत,” तेंव्हा अनायसे भिती निर्माण होते व तर्क विसंगत स्वार्थ व लाभासाठी निष्पापींवर अत्याचार होतात व अबला भगिनी अंधश्रध्देस बळी पडून ते या नराधमांच्या विकृत वाासनेच्या बळी जातात .. हे दुष्ट चक्र थांबवणे बाबत सरकारी व्यवस्थेची काय पावले पडतात (?) हेच लोकशाही व्यवस्थेत सत्तास्थानी असलेल्या सरकारचे कर्तव्य असते. देशात प्रगतीशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने अंध श्रद्धा- जादू टोणा विरोधी बिल हे समाजाच्या व निष्पाप लोकांच्या रक्षणा साठी केले.. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणी; प्रबोधन व जनजागृती अभावी अबला भगिनी आज ही भोंदू गिरीचे बळी ठरत आहेत हे सत्तेवरील राज्यकर्त्यांचे अपयश असल्याची घणाघाती टिका काँग्रेस चे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुणे काँग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

याप्रसंगी सुभाष थोरवे , ,भोला वांजळे तात्या शिर्के ,आबा जगताप ,गणेश मोरे ,राजेश सुतार ,संजय अभंग ,सुभाष जेधे गणेश शिंदे ,उदय लेले ,नरेश आवटे आदि उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, येनकेन प्रकारे सत्ता ताब्यात आल्यावर रयते प्रती, लोक रक्षणा प्रती, सामाजिक सुरक्षेच्या राजधर्माला सोईने तिलांजली दिली जाते.. हेच संतांच्या, समाज क्रांती कारकांच्या व राष्ट्रपुरुषांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडते आहे.. याची खंत वाटते.
समाजात योग्य वेळी योग्य मदतीच्या शोधात माणसे असतात. जेंव्हा लोकांच्या व्यक्तीगत सामाजिक अडचण वाढतात. सरकारी यंत्रणेवर वा शासकीय व्यवस्थेवरील सामान्य लोकांचा विश्वास उडायला लागतो… त्यांना सरकारचा ठोस आधार वाटत नाही.. तेंव्हा ते समस्यांसाठी मार्ग शोधू लागतात व बुवाबाजी’चा आधार घेण्यास आंधळे पणाने तिकडे वळतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन व वास्तववादी प्रयत्न शासकीय व्यवस्थेकडून होत नसल्याने हे प्रकार घडतात.
जादू टोणा व अंधश्रद्धा विरोधी कायदा याचे सरकार किती प्रचार व प्रसार करते (?) या बाबत सरकार पातळीवर प्रचंड अनास्था पाहायला मिळते. निद्रित राज्यकर्ते व सरकारी व्यवस्थेमुळे भोंदू बाबांचे व पाखंडीचे प्रस्थ वाढल्याची टीका ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते यांनी केली.
व्यवस्था पारदर्शक व संवेदनशीलतेने काम करत नाही त्यामुळे ही असे दुर्दैवी प्रकार घडतात.
पुरोगामी व प्रगतीशील महाराष्ट्रात.. बुवा बाजीचे व भोंदू गिरी च्या फसवणुकीचे प्रस्थ वाढण्यास राजकीय हस्ती व राजाश्रय कारणीभूत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
“राज्यसरकार मधील सत्तेच्या प्रभावाचा प्रचंड दुरुपयोग” भोंदूबाबा खरात सारखी मंडळी करत होती .. तेंव्हा फडणवीसांचे सरकार काय करत होते…
४ मार्च २०२५ दैनिक खबरदार पुढारी… भोंदू कॅप्टन बाबाचा पोल खोल… बातमी प्रसिद्ध…
किती शासकीय व पोलीस यंत्रणांनी याची दखल घेतली,।

उलट पक्षी,,, महिला आयोग प्रमुख चाकणकर यांनीच पुढारी वृत्त पत्राचे संपादक खेमनार यांनाच माफ़ी मागायला लावली?
भक्ती ही आंतर्मनाची ठेव आहे.. बाह्य दिखाव्याची नाही…
संकटाचा तार्किक शोध घेण्याऐवजी झटपट उपायांचा मार्ग लोक भिती व स्वार्था पोटी निवडतात.. अदृश्य शक्तीवर, व अंधश्रद्धा, जादूटोणा वर लोकांना विश्वास ठेवूनये यावर शासकीय यंत्रणेने प्रबोधन केले पाहिजे.
व्यवस्थेस प्रश्न विचारणे .. जनतेस सक्षम, साक्षर व वस्तुनिष्ठ ठेवण्यासाठी सतर्कता जोपासण्याचे काम राज्य सरकारचेच आहे. देशात सुसंस्कृत, सभ्य, प्रगत समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राच्या प्रतिमेस’ धक्का… खरात प्रकरणाने मोठा बसला आहे. महाराष्ट्राची ओळख ही प्रगतिशील विचारांमुळे राहीली आहें.
महात्मा फुले, छ श्रीमंत शाहू महाराज, डॅा आंबेडकर बुध्दीप्रामाण्यवाद आगरकर आदींनी समाजात विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची व अन्याय विरुद्ध ऊंभे राहण्याची शिकवण दिली.. अंधश्रद्धा भेदभाव शोषण या विरुद्ध लढण्याची शिकवण दिली..! विवेक , समता व विज्ञान निष्ठ दृष्टिकोन दिला
भारतीय राज्यघटनेत देखील याच विचारांना स्थान आहे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल ५१ (fundamentals duties) मुलभूत कर्तव्यामध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद जपणे व प्रगत आणि प्रगल्भ समाज व्यवस्था निर्माण होण्यासाठी सुधारणा करण्याची भावना जपण्याचे म्हटले आहे.
त्यामुळे समस्या व संकटे श्रध्देत नाही तर अंधश्रद्धेत आहेत असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सदानंद अंचवल स्मृती पुरस्कारांचे वितरण

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग...

आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक...

रामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

भाविक व नागरिकांचा उदंड प्रतिसाद पुणे:   रामनवमीनिमित्त धायरी परिसरात भगवान...