मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या हातातील घड्याळ गणेश शिंदे यांच्या हाती बांधून केला सन्मान

Date:

कोथरूडमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात; गणेश शिंदे यांच्या भाषणाने श्रोते भारावले

पुणे— रामनवमीच्या निमित्ताने कोथरूड येथील जीत मैदानावर आयोजित विराट हिंदू संमेलनाला श्रोत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. तुडुंब भरलेल्या मैदानात आणि सभागृहात उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.

या संमेलनात वक्ते गणेश शिंदे यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी शैलीत निसर्ग, समाज आणि अर्थकारण या विविध विषयांना स्पर्श करत श्रोत्यांना भावनिक साद घातली. ऐतिहासिक दाखले देत त्यांनी सद्य परिस्थितीची सांगड घालत विचार मांडले. “आज सगळं जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभं असताना संतांचे विचारच मानवजातीला तारू शकतात,” असा आशय व्यक्त करत त्यांनी श्रोत्यांना विचारप्रवृत्त केले.

त्यांच्या भाषणादरम्यान कधी टाळ्यांचा कडकडाट, कधी स्तब्ध शांतता, तर कधी श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसून आले. संपूर्ण वातावरण अक्षरशः भारावून गेले होते.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी स्वतः उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत शिंदे यांच्या वक्तृत्वाचे मनापासून कौतुक केले. त्यानंतर ते शिंदे यांच्या जवळ जाऊन त्यांनी आपल्या हातातील घड्याळ त्यांच्या हातात बांधत विशेष सन्मान केला.

या प्रसंगी प्रतिक्रिया देताना गणेश शिंदे म्हणाले, “दादा, ही वेळ कायम लक्षात राहील.”

या प्रेरणादायी क्षणामुळे संमेलनातील उपस्थितांमध्ये उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला एकमताने मान्यता,विरोध भाषणात पण लेखी उपसूचना एकाकडूनही नाही

पुणे _महापालिकेतील स्थायी समितीने मुख्य सभेला सादर केलेल्या १५...

घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर २% वरून १% करावा:नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी,...