जुगाड भारतीय संशोधनाची विशेषता- केम्ब्रीज विद्यापीठाचे प्रा. जयदीप प्रभू

Date:

फ्यूल मध्ये लीन स्पार्कचे प्रकाशन

पुणे, दि. २६ मार्च: भारतीय संशोधनाची विशेषता मर्यादित संसाधने वापरून गुंतागुंतीच्या समस्येचे निराकरण करणे. काटकसरीचे नवोन्मेष, तात्पुरते उपाय आणि लवचिकता व वेग यातून अपारंपरिक शोध असतो त्यालाच जुगाड असे संबोधू शकतो. असे मत केम्ब्रीज विद्यापीठातील नेहरू प्रोफेसर ऑफ इंडियन बिझनेस अ‍ॅट जज बिजनेस स्कूलचे प्राध्यापक व लेखक जयदीप प्रभू यांनी व्यक्त केले.
फ्यूल बिजनेस स्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे प्रा. लेखक जयदीप प्रभू लिखित लीन स्पार्क या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते.
 यावेळी फ्यूल ग्रूप ऑफ इन्स्टीट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे व प्रा.मयूरी देशपांडे ह्या उपस्थित होत्या.
प्रा.जयदीप प्रभू म्हणाले, लीन स्पार्कची चार वैशिष्ट्ये आहते. लीन अमंलबजावणी महत्वाची असून संरचित प्रयोग आणि निरंतर शिक्षण गरजेचे. उद्देशपूर्ण साधेपण असावे ज्यात आवश्यक वैशिष्ट्ये व अनावश्यक गुंतागुंत दूर करणे आणि अनुकूलनक्षम विस्तारक्षमतेत विविध वातारवणांमध्ये विकसित होण्यासाठी डिझाइन करणे गरजेचे आहे.
तसेच मोठ्या संस्थांसाठी कार्य करतांना भरपूर शिकणे, चपळ व्हायला शिकणे,  वगळलेले गट समाविष्ट करणे, कर्मचार्‍यांना प्रयोग करण्यासाठी वेळ आणि संधी देणे.  चपळ उद्योजकांसह व्यस्त रहाणे आणि उद्योन्मुख बाजारपेठांशी संलग्नीत होऊन जुगाड करायला शिकण्याची मानसिकता ठेवावी. त्याच प्रमाणे लहान संस्थांनी मोठ्या संस्थांसोबत भागीदारी करायला शिकावे.
डॉ. केतन देशपांडे म्हणाले, फ्यूल संस्था राष्ट्र निर्मिती साठी कार्य करीत आहे. युवकांच्या या देशात कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातूनच आत्मनिर्भर भारत बनावयास वेळ लागणार नाही. आर्थिक महासत्ता म्हणून उद्यास येणार्‍या भारतात आता संशोधनला अधिक प्राधान्य द्यावे. सध्या देशाला स्कील बेस्ड युवकांची गरज आहे.
या प्रसंगी लेखक जयदीप प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सल्ला दिला की नेतृत्व गुण,कष्ट, संशोधन आणि कमी खर्चात सामाजिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे. यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केल.
सूत्रसंचालन  सान्वी महेश जोगदंड  या विद्यार्थीनीने   केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’

आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या...

कसबा पेठेतील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तीभावाने साजरा

पुणे : कसबा पेठेतील श्रीराम मंदिरात (चव्हाण) आज पारंपरिक...