परदेशस्थ मराठी नागरिकांसाठी विधानभवनात ‘स्नेहकक्ष’ उभारणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

मुंबई दि.२८: महाराष्ट्रात व्यवसायाकरिता ज्या परदेशस्थ मराठी माणसांचे राज्य सरकारसोबत सामंजस्य करार झाले आहेत त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासोबतच त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण होण्यासाठी विधानभवनातील उपसभापती कार्यालयात आठवड्याच्या प्रत्येक मंगळवार व बुधवारी दुपारी ४ ते ८ या वेळेत भेटणार असून याकरिता ‘स्नेहकक्ष’ उभारण्यात येणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

नवी मुंबई येथील सिडको येथे सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलन-२०२४ कार्यक्रमास शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मराठी भाषा व शालेय शिक्षण तथा मुंबई (शहर) पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ज्यावेळी पहिल्यांदा पानिपत येथे स्मारकाला भेट दिली त्यावेळी समजले की, आजूबाजूच्या पाच जिल्ह्यांमध्ये मराठी लोकांचे वास्तव्य आहे. देशातील, परदेशातील मराठी माणूस एकत्रित आला पाहिजे. परदेशातील मराठी लोकांना अनेक सांस्कृतिक प्रश्न उद्भवत असतात त्यावर उपाययोजना व एकमेकांना मदत करण्याच्या दृष्टीने मराठी मंडळांसारखी व्यासपीठे असावीत. ज्यावेळी लंडनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात भेट दिली. त्याठिकाणी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकच वाचण्यासाठी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. आपली संस्कृती, इतिहास जपण्यासाठी ग्रंथालयात अनेकानेक मराठी पुस्तके असावीत याकरिता नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे स्त्री आधार केंद्र यासंस्थेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचे कार्य करत असल्याने विविध देशांत महिलांच्या सुरक्षेबाबत, सशक्तीकरणाबाबत जे कायदे आहेत त्याची माहिती जाणून घ्यायची असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गकिल्ल्यावरील देवळांमध्ये दिवाबत्ती, सणावाराला फुलांची आरास होत नाही. याकरिता अशी ठिकाणे इतिहास संशोधकांच्या माध्यमातून शोधून तिथे दिवे लावण्याचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींना अशी ठिकाणे माहीत असतील त्यांनी याबाबत माहिती देण्याचे आवाहन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...