महिलांच्या नावावरील ५०० फुटाच्या घराला ५० टक्के मिळकत करात सवलत , वाहतूक-आरोग्यासाठी मोठ्या योजना

Date:

पुणे-पुणे महानगरपालिकेचा 15 हजार 669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केला. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांना उत्तम सुविधा पुरवण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. पुणे शहर राहण्यासाठी सर्वोत्तम बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भिमाले यांनी यावेळी सांगितले.महिलांसाठी विशेष योजना जाहीर करताना, 31 मार्च 2026 पर्यंत मालमत्तेवर नाव असलेल्या महिलांना 50 टक्के करसवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात 100 मोफत स्वच्छतागृहे उभारण्याची योजना असून, महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

या अर्थसंकल्पात वाहतूक आणि पर्यावरण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात 1 हजार ई-बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रणासाठी देशातील पहिली अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शहरातील प्रदूषण पातळी 350 पर्यंत पोहोचली असून ती 50 पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आरोग्य क्षेत्रातही मोठ्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या 53 बाह्यरुग्ण विभाग आणि 20 प्रसूतिगृहांमार्फत मोफत सेवा दिली जात असून, नागरिकांना 80 कोटी रुपयांची औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. बाणेर येथे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आले असून, लवकरच त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वारजे येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे कामही सुरू आहे.

शहरी गरिबांसाठीच्या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्यात येणार असून, त्यासाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, शहरातील उद्याने, तलाव आणि प्राणीसंवर्धनावरही भर देण्यात आला आहे. राजीव गांधी झुलॉजिकल पार्कच्या विकासासाठी 60 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असून, नवीन वन्यप्राणी आणण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

५४ किमी भुयारी रस्ते, नदी पुनरुज्जीवन आणि गृहनिर्माण प्रकल्पांना चालना

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या...

‘सीएसआर’ कक्ष अधिक सक्षम करून ,अ‍ॅमेनिटी स्पेसेस भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न वाढविणार

महसूल व्यवस्थापनावर भरस्वतंत्र महसूल समिती, विशेष कक्ष आणि करसंकलन...

चांदणी चौक परिसरात ५० एकर जागेवर ‘शिवसृष्टी,लोहगावला भारत मंडपम, रोप-वे, ऑर्बी हवाई अनुभव:

सांस्कृतिक वारसा जतनासह पर्यटनाला चालना पुणे : शहराच्या सांस्कृतिक वारशाचे...