चांदणी चौक परिसरात ५० एकर जागेवर ‘शिवसृष्टी,लोहगावला भारत मंडपम, रोप-वे, ऑर्बी हवाई अनुभव:

Date:

सांस्कृतिक वारसा जतनासह पर्यटनाला चालना

पुणे : शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन करत पर्यटन आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसृष्टी, भारत मंडपम, हेरिटेज कॉरिडॉर आणि विविध स्मारकांच्या उभारणीद्वारे पुण्याची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
चांदणी चौक परिसरात ५० एकर जागेवर ‘शिवसृष्टी’ उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य प्रदर्शन उभारण्यात येणार आहे. तसेच लोहगाव येथे नवी दिल्लीच्या धर्तीवर ‘भारत मंडपम’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन व प्रदर्शनांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शहराच्या प्रवेशद्वारांवर छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून, प्रकाशयोजना, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक प्रतिकृतींच्या माध्यमातून शहराची ओळख अधोरेखित केली जाईल. पर्यटन वाढीसाठी सारसबाग ते पर्वती रोप-वे, सारसबागेत काचेचा पूल आणि ‘ऑर्बी’ या अत्याधुनिक हवाई अनुभव केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहालय, सांस्कृतिक आराखडा आणि आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पुणे प्रथम’ या ब्रँडिंगद्वारे शहराची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, बाणेर-बालेवाडी येथे ‘पुणे कला अकादमी’ची स्थापना आणि कोथरूड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कला, साहित्य आणि संस्कृतीला नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
तिहास जतन करण्यासाठी भिडेवाडा येथे महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारक, संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवे स्मारक, तसेच सावरकर, तानाजी मालुसरे आणि उमाजी नाईक यांच्या स्मारकांचे जतन व विकास करण्यात येणार आहे.

पुणे ‘ग्रोथ हब’कडे वाटचाल
जीसीसी, गुंतवणूक सुविधा कक्षातून आर्थिक विकासाला चालना

शहराच्या आर्थिक विकासाला वेग देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी), ‘पुणे ग्रोथ हब’ आणि गुंतवणूक सुविधा कक्ष अशा महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात पुण्याला जागतिक स्तरावर सक्षम केंद्र बनविण्याचा निर्धार स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला.
राज्याच्या नवीन उद्योग धोरणानुसार पुण्याला ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) हब म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळून गुंतवणूक वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. या प्रक्रियेसाठी पुणे महानगरपालिका आवश्यक पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सहकार्य उपलब्ध करून देणार आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘पुणे महानगर ग्रोथ हब’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याद्वारे तंत्रज्ञान, उद्योग-उत्पादन, शिक्षण, सांस्कृतिक वारसा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्रांमध्ये पुण्याला जागतिक पातळीवर अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रोजगारनिर्मिती वाढविणे आणि शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
शहरात गुंतवणूक वाढीसाठी ‘गुंतवणूक सुविधा कक्ष’ स्थापन करण्यात येणार असून, गुंतवणूकदारांना आवश्यक परवानग्या, मार्गदर्शन आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे उद्योग स्थापन प्रक्रियेला गती मिळून पुण्याच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘सीएसआर’ कक्ष अधिक सक्षम करून ,अ‍ॅमेनिटी स्पेसेस भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न वाढविणार

महसूल व्यवस्थापनावर भरस्वतंत्र महसूल समिती, विशेष कक्ष आणि करसंकलन...

पुणे महापालिकेचा 15 हजार 669 कोटींचा अर्थसंकल्प :शहर सर्वोत्तम बनवण्यावर भर, वाहतूक-आरोग्यासाठी मोठ्या योजना

पुणे-पुणे महानगरपालिकेचा 15 हजार 669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी...

पुण्यात येणार अनाकोंडा,जिराफ…कॅन्सर हॉस्पिटल, आयव्हीएफ सुविधा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

निरोगी पुण्यासाठी वैद्यकीय कवचपुणे : शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था...