पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारकाला भेट देऊन सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
आज राजगुरू नगर येथे भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या तर्फे आयोजित “वंदे मातरम् सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य प्रदर्शनाच्या कार्यक्रमा निमित्ताने मंत्री अँड आशिष शेलार हे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हुतात्मा राजगुरू स्मारकाचे जे जतन संवर्धनाचे काम पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत आहे, या कामाची पाहणी व आढावा यावेळी मंत्री शेलार यांनी घेतला.
तसेच त्यानंतर मंत्री शेलार यांनी
दिवंगत राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब आपटे यांचे स्मारक म्हणून ‘आपटे वाडा’ प्रसिद्ध असलेल्या स्मारकाला ही भेट दिली.
यावेळी संबंधित सर्व अधिकारी तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी ही उपस्थितीत होते.

