पुणे- आपण राहतो त्या प्रभागाच्या विकासासाठी ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांचा सन्मान करण्याचा एक आगळावेगळा आपुलकीचा समारंभ प्रभाग क्र. ३० मधील नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे सदस्य स्वप्नील देवराम दुधाने यांनी आयोजित केला होता ,आपल्या गोड आणि कटू अनुभवाचे बोल सांगत ज्येष्ठ नागरिकांनी युवा पिढीतील स्वप्नील देवराम दुधाने यांच्याशी मनमोकळा संवाद साधला
यावेळी दुधाने यांनी सांगितले कि,’आपल्या प्रभाग क्र. ३० मधील राजाराम पुल येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या काही वर्षांपासून अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र येत असून आपला वेळ व्यतीत करत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची भेट घेऊन मनमोकळा संवाद साधण्याची मनिषा होती.आज त्यांच्याशी संपर्क करत आणि हितगुज साधले. यावेळी त्यांनी त्यांचे प्रचंड अनुभवांचे गाठोडे उघडत अमूल्य मार्गदर्शन केले. विविध विषयांवर सविस्तर चर्चा करत आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी प्रभागाच्या आणि पर्यायाने शहराच्या विकासासाठी योगदान ते सदैव आमच्यासोबत असतील, असा निर्वाळा त्यांच्याकडून प्राप्त झाला.

