वय फक्त आकडा ठरला; ५ ते ७० वयोगटातील महिलांकडून सिंहगड २.५ तासांत सर

Date:

पुणे: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सखी प्रेरणा मंच व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या वतीने आयोजित ‘हिरकणी ट्रेक’ या विशेष किल्ले सिंहगड मोहिमेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत तब्बल २८९० महिला सहभागी झाल्या.

‘आम्ही स्वराज्याच्या रणरागिणी, ज्योत स्वराज्याची तेवत ठेवू मनी’ या प्रेरणेने मोहिमेत महिलांनी उत्साहाने सहभाग घेत किल्ला सर केला. यावेळी त्यांच्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास व एकतेची भावना प्रकर्षाने दिसून आली. विशेष म्हणजे ५ ते ७० वय वर्षे वयोगटातील महिलांनी पायथ्यापासून संपूर्ण किल्ला २.५ तासात सर केला.

यापूर्वी रायरेश्वर, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी या किल्ल्यांवरही मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही ‘हिरकणी ट्रेक’ मोहीम विशेष ठरली. महिलांच्या सहभागातून स्त्री शक्तीचा साहसाचा व स्वावलंबनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

सखी प्रेरणा मंच व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्याकडून मोहिमेत सहभागी महिलांसाठी प्रवास व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांकडून आवश्यक सुरक्षा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सखी प्रेरणा मंचाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सक्षमीकरणात्मक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. सोबतच फोर्ट फिट मुव्हमेंटचे हे पाचवे यशस्वी पुष्प ठरले आहे.

मोहिमेबद्दल बोलताना मंचाच्या संस्थापक अध्यक्षा व नगरसेविका ऐश्वर्या पठारे म्हणाल्या, “महिलांमध्ये साहस, आत्मविश्वास व एकजुटीची भावना वाढावी, तसेच स्वराज्याच्या इतिहासाशी त्यांचा जवळचा संबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने महिला भगिनींनी सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला, याचा मनापासून आनंद आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढेही सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.”

मोहिमेत सहभागी महिलांनी सखी प्रेरणा मंचाचे व फोर्ट फिट मुव्हमेंटचे आभार व्यक्त करत, “या मोहिमेमुळे आम्हाला आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली. संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित होते. अशा उपक्रमांमुळे महिलांना एकत्र येऊन स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि नव्या उर्जेने पुढे जाण्याची संधी मिळते,” अशा भावना व्यक्त केल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

मुंबई: विधान भवन येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे...

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध...

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर

पुणे-स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब...