सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Date:

पुणे, दि. 23: राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी व सांस्कृतिक संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्यावतीने विमाननगर येथील सिम्बॉयसिस ऑडिटोरियममध्ये ‘मोगरा फुलला’विशेष सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेविका ऐश्वर्या पठारे, ज्येष्ठ नागरिक दिलीप पवार आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण दादा पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने अधीक्षक जानवी जानकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

या सोहळ्यात गणेश शिंदे यांनी ‘मोगरा फुलला’ हे सादरीकरण सादर केले. अभ्यासपूर्ण निवेदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिमय झाले होते. संत साहित्यावर आधारित या कार्यक्रमाने उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णाई उळेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी जानवी जानकर यांनी सर्वांचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध...

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर

पुणे-स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब...

जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम बनवा – सुनील माने

पुणे : महाराष्ट्राचा एपस्टीन ढोंगी बाबा अशोक खरात...

महावितरणच्या वीजसेवा आता ‘व्हॉट्सॲप’वर

वीजबिलाची माहिती, भरणास‍ह तक्रार नोंदविण्याचीही सोय पुणे, दि. २३ मार्च...