पुणे : महाराष्ट्राचा एपस्टीन ढोंगी बाबा अशोक खरात याच्या प्रकरणात जादू टोणा विरोधी, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा अंमल केला पाहिजे. मात्र दुर्देवाने या कायद्याचे नियम आजपर्यंत बनवले गेली नाहीत. या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत ते म्हणाले, अशोक खरात याच्या विरोधात जादूटोणा विरोधी, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा अंमल केला पाहिजे त्या स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे. मात्र दुर्दैवाने २०१३ साली हा कायदा आपण अंमलात आणला मात्र या कायद्याचे नियम आजपर्यंत बनवले गेले नाहीत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करायला लावून सामाजिक न्याय विभाग व अन्य विभागाच्या समन्वयाने हे कायदे कसे अंमलात येतील या संदर्भातील नियम तातडीने तयार करायला घेतले पाहिजेत. राज्यभरातल्या पोलिस स्टेशन मध्ये या कायद्यानुसार अंधश्रद्धा विरोधी कक्ष तयार करण्याची महत्वाची तरतूद आहे. अनेक पोलिस स्टेशनमध्ये आशाप्रकाच्या विभागाची निर्मिती केली आहे. पण कुठल्या नियमानुसार त्याच्यावर कार्यवाही करायची? हे पोलिसांना माहीत नाही. त्यामूळे ज्यावेळी आपण कायदे तयार करतो तेंव्हा त्याचे नियम तयार करायला लागतात. त्याची अंमलबजावणी करावी लागते त्यामूळे हे नियम तातडीने करायला पाहिजेत. महाराष्ट्राने २०१३ मध्ये हा कायदा आणला, मात्र त्यावेळे पासून आजपर्यंत या कायद्याचे नियम तयार केलेले नाहीत. दहा वर्ष जर आपण कायदे बनवून त्याचे नियम बनवत नसू तर त्याच्यापेक्षा लांच्छनास्पद काही होऊ शकत नाही. त्यामूळे अशा भोंदू बाबांचे फावते. कुठल्याही नियमानुसार त्याच्यावर कार्यवाही होत नाही . आणि वेगवेगळे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाते, मात्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करता येत नाहीत त्यामूळे याचे नियम तातडीने तयार करावे लागतील असेही माने यांनी म्हटले आहे.

