महावितरणच्या वीजसेवा आता ‘व्हॉट्सॲप’वर

Date:

वीजबिलाची माहिती, भरणास‍ह तक्रार नोंदविण्याचीही सोय

पुणे, दि. २३ मार्च २०२६- दिवसेंदिवस महावितरण स्मार्ट होत चालले असून, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची ‘Ease of Doing Business’ ही संकल्पना महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सत्यात उतरवली आहे. ग्राहक दैनंदिन जिवनात जे माध्यम वापरतात त्याच ‘व्हॉट्सॲपवर’ आता महावितरणच्या सेवा अधिकृतपणे पोहोचल्या आहेत. अगदी वीजबिल पाहण्यापासून वीजबिल भरण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी ग्राहकाला उपलब्ध झाले आहे. वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

राज्यात महावितरणचे ३ कोटी १२ लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. तर पुणे परिमंडलात ग्राहकांची संख्या ३९ लाखांच्या घरात आहे. या सर्व ग्राहकांना १३ मार्चपासून महावितरणच्या व्हॉट्सॲप सेवेचा लाभ मिळत आहे. पूर्वी दरमहा येणारे वीजबिल व ते भरल्याची पावती घराघरांत फाईलिंग करुन जतन केले जात असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून महावितरण कंपनीने मोबाईल ॲप, संकेतस्थळावर विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्याने लाखो ग्राहक अशा सेवांचा लाभ घेत आहेत. आता ह्याच सेवा ग्राहकांना व्हॉट्सॲपवर उपलब्ध झाल्या आहेत.

व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा:


१. वीज बिल आणि पेमेंट: ग्राहक आपले चालू वीज बिल पाहू शकतात आणि तिथूनच थेट बिलाचा भरणाही करू शकतात. त्याकरिता डेबिट कार्ड, युपीआय आदींचे पर्याय विचारले जातात.


२. ई-बिल आणि पावती: व्हॉट्सॲपवरून डिजिटल बिल (e-bill) डाऊनलोड करण्याची सोय असून, बिल भरल्यानंतर त्याची पावतीही तात्काळ मिळवता येईल.


३. तक्रार नोंदणी: वीज पुरवठा खंडित होणे किंवा विजबिलांबाबत तसेच इतर तांत्रिक समस्यांबाबतची तक्रार आता व्हॉट्सॲपवर नोंदवता येईल आणि त्या तक्रारीचे सद्यस्थितीही तपासता येईल.


४. नवीन जोडणी अर्जाचा मागोवा: नवीन वीज जोडणीसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाची सद्यस्थिती काय आहे, हे ग्राहकांना घरबसल्या समजेल.


५. गो-ग्रीन सुविधा: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कागदी बिलाऐवजी ई-बिल घेण्याच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत ग्राहक येथूनच सहभागी होऊ शकतात किंवा बाहेर पडू शकतात.


६. चॅटबॉट सपोर्ट: ग्राहकांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे देण्यासाठी एक ‘इंटरॲक्टिव्ह चॅटबॉट’ देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘ब्ल्यू टिक’ असल्याची खात्री करा

महावितरणकडून व्हॉट्सअॅप अपडेट्सकरिता 9167777791 हा क्रमांक अधिकृतपणे वापरला आहे. ग्राहकांनी या नंबरला ‘Hi’ संदेश टाईप करुन त्यानंतर आपल्या पसंतीची भाषा (मराठी, हिंदी किंवा इंग्रजी) निवडून हवी असलेली सेवा निवडावी. महावितरणने हा क्रमांक Verify केलेला आहे. त्याची खात्री करण्यासाठी कंपनीच्या नावापुढे ‘ब्ल्यू टिक’ असल्याची खात्री करावी. तसेच कंपनीचे संकेतस्थळ, ग्राहक तक्रारीसाठीचा ईमेल आदी माहितीही ‘बायो’मध्ये दिली आहे.

पेपरलेस सेवांवर महावितरणचा भर- मुख्य अभियंता

वसुली करतेवेळी वीजबिल मिळाले नाही, मिळाल्यावर भरतो अशा सबबी ग्राहक द्यायचे. मात्र आता ग्राहकाला हव्या असणारी वीजबिलाची माहिती महावितरणने आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध केली आहे. ग्राहकांनी आता पेपरलेसकडे वाटचाल करावी. छापील वीजबिलाऐवजी डिजीटल सेवांवर भर द्यावा.

सुनिल काकडे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम बनवा – सुनील माने

पुणे : महाराष्ट्राचा एपस्टीन ढोंगी बाबा अशोक खरात...

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...