अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन २२ मार्च रोजी पुण्यात

Date:

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पद्मपाणी फाउंडेशन आयोजित तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, भवानी पेठ (टिंबर मार्केट) येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे.

या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास भदंत हर्षबोधी महाथेरो, आंतरराष्ट्रीय धम्म प्रसारक गगन मलिक, अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बिमलेंद्र कुमार, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि विद्यमान उपमहापौर परशुराम वाडेकर हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात देशभरातील पाली भाषा व बौद्ध अध्ययन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये डॉ. महेश डेगावकर, अब्दुल मोमीन, डॉ. योजना भगत, धर्मदीप चावडे, डॉ. गौतम चाबुकस्वार आणि पद्मपाणी फाउंडेशनच्या संचालिका  सुवर्णा डंबाळे आदी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत.

पाली भाषा, बौद्ध साहित्य, संशोधन आणि सांस्कृतिक परंपरा यांवर विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार असून पाली भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

मागील वर्षी झालेल्या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाही या संमेलनाबाबत मोठी उत्सुकता असून १००० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभागासाठी नोंदणी व चौकशी केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पाली भाषा व बौद्ध साहित्याविषयी रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पद्मपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल डंबाळे, संचालिका सुवर्णा डंबाळे आणि आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी महापालिका सज्ज

पुणे- महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

वीज बिल वसुली दरम्यान महिला वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे, दि. १६ मार्च...

बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 31 मार्च अखेर पूर्ण करावे- अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

बँकर्सची जिल्हा सल्लागार समिती बैठक संपन्न पुणे, दि. 17: जिल्ह्यातील...

अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

पुणे, दि. १७ : पुणे ARO तर्फे अग्नीवीर भरतीसाठी...