पुण्यातील गॅस एजन्सी ताब्यात घ्या आणि सरकारच्या वतीने चालवा: आमदार रासनेंची मागणी

Date:

कृत्रिम टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यासाठी उपाय

पुणे : जगभरातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील गॅस एजन्सी ताब्यात घेऊन प्रशासनाच्या मार्फत चालवाव्यात अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डूडी यांनी यावर तातडीने निर्णय घ्यायला हवा असेही त्यांनी म्हटल आहे .
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकात रासने यांनी म्हटले आहे कि,’ सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून देशभरात इंधनाच्या संभाव्य टंचाईबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत देखील नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. काही गॅस एजन्सीकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, सिलिंडर वितरणात जाणूनबुजून विलंब करणे, साठेबाजी करणे तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी किंवा जास्त दराने विक्री करून काळाबाजार केल्याच्या बाबी नागरिकांकडून निदर्शनास येत आहेत. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसून त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहरातील सर्व गॅस एजन्सींची तात्काळ तपासणी करून, त्या तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात घेऊन प्रशासनाच्या निगराणीखाली गॅस वितरण व्यवस्था चालविण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे. यामुळे गॅस पुरवठा व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येईल व कृत्रिम टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यास मदत होईल.
तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण राहावे व गॅस सिलिंडरचे साठा, वितरण व दर यावर नियमित देखरेख ठेवता यावी यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती पुणे शहरातील सर्व गॅस एजन्सींवर निरीक्षणासाठी करण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा काळाबाजार होऊ नये.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर व योग्य दरात गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक ती उपाययोजना कराव्यात, अशी विनंती.रासने यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सिनेमागृहांमध्ये येणार ‘लाडकी बहीण’

काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचे काम करतात....

लाडक्या बहिणींना सरकार फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाचवेळी देणार; 15 एप्रिलपर्यंत पैसे वर्ग होण्याची शक्यता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी पात्र महिलांचा...

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी

ठाणे ते पुणे अवघ्या दोन तास २५ मिनिटांत जीवनदायी...

सायबर सुरक्षेबाबत सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक – डॉ. रोहन न्यायाधीश

सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ  व आयबीएमआर,वाकड  यांच्यावतीने आयोजित सायबर सुरक्षा विषयावरील  कार्यशाळा  संपन्न पुणे : दिनांक...