गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा:महापौर मंजुषा नागपुरे

Date:

पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या.गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शहरातील परिस्थितीची माहिती घेतली.

महापौर नागपुरे यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पुणे शहरात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून दररोज सुमारे १० हजार सिलेंडरचे वितरण नियमितपणे करण्यात येत आहे. शहरातील सुमारे ८५ टक्के सिलेंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे.

गॅस वितरण कंपन्यांच्या समन्वयातून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन सिलेंडरची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही नागपुरे यांनी केले.

गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून पुरवठा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...

सणसवाडीत 1.79 कोटींचे मेफेड्रॉनसह राजस्थानच्या ड्रग तस्कराला पकडले

पुणे-सणसवाडी परिसरात सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थविरोधी पथकाने...