पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे तीव्र आंदोलन.
पुणे -आचारसहिंता भंग करून पी .एम. पी. एम. एल. या संस्थेने भ्रष्ट पध्दतीने राबविलेल्या ज्युनियर क्लार्क प्रमोशन/पद भरती, बस खरेदी व कंत्राट प्रक्रियेतील अनियमीतता, स्टोअर विभाग व साहित्य भ्रष्ट पध्दतीने खरेदी, बस स्टॉप जाहिरातीमधील भ्रष्ट कंत्राट पध्दती याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पी. एम. पी. एम. एल. मुख्य कार्यालय, स्वारगेट, पुणे येथे आंदोलन करण्यात आले.
पी. एम. पी. एम. एल. मधील अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचारामुळे प्रमाणिक पुणेकर करदात्या नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. सदर प्रकरणी तातडीने चौकशी करून राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी केली.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक प्रशांत जगताप, विशाल मलके, अश्विनी लांडगे, दिपाली डोख, सुनिल शिंदे, उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाणे, भरत सुराणा, नुरुद्दीन सोमजी, बाळासाहेब अमराळे, राज अंबिके, द. स. पोळेकर, संदिप मोकाटे, रवि ननावरे, कृष्णा सोनकांबळे, सुरेश चौधरी, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अनुसया गायकवाड, सिमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, सुंदर ओव्हाळ, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, अक्षय माने, संजय मोरे, राकेश नामेकर, रवि पाटोळे, सचिन सावंत, अनिल धिमधिमे, सागर धाडवे, फिरोज शेख आदी सहभागी होते.


