पुण्यातील कॉंग्रेसमध्ये भाजपची बी टीम: अभय छाजेड यांच्या वर गंभीर आरोप- छाजेड म्हणाले,हे बिनबुडाचे आरोप

Date:

पुणे -राज्यातील काही नेते भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप येथील कार्यकर्ते करू लागले असून त्याबाबत कालच एक व्हिडीओ व्हायरल झाला .त्यानंतर आज आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड यांच्यावर भाजपच्या सहाय्यासाठी पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारीचे तिकीट विक्री करणे आणि जमीन बळकावणे, आर्थिक गैरव्यवहार करणे असे गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अमीर शेख यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्रात केले असून छाजेड यांना तात्काळ निलंबित करून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, अमीर शेख यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी बेजबाबदार कामे करत संघटनेची वाट लावली आहे. त्यांना स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने ते आता बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे देऊन ते सिद्ध केले पाहिजेत, केवळ हवेत आरोप करून प्रसिद्धी मिळवू नये, असे छाजेड यांनी म्हटले आहे.

ॲड. शेख यांनी पत्रात नमूद केले आहे की, ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. त्यांनी नऊ वर्षे नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. पक्षातील निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ही तक्रार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छाजेड यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप करताना शेख यांनी म्हटले आहे की, पुण्यातील कोथरूड येथील एका ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ९० गुंठे जमीन बळकावून त्यावर बंगला आणि क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. तसेच, पुण्यात १०० एकरपेक्षा जास्त बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

याशिवाय, पुणे मनपा निवडणूक २०२६ मधील उमेदवारी वाटपात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील व्यक्तींना तिकीट देण्यात आले, असे शेख यांनी म्हटले आहे. राजू पवार आणि समाधान शिंदे यांची नावे त्यांनी पत्रात नमूद केली असून, हे दोघेही अधिकृतरीत्या काँग्रेसमध्ये दाखल नसतानाही त्यांना तिकीट देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

प्रभाग क्रमांक ३५ (सिंहगड रोड) मध्ये जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी सुचवलेल्या चार निष्ठावान कार्यकर्त्यांची नावे डावलून तिकीट एका अज्ञात व्यक्तीला विकल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने उमेदवारी अर्जही भरला नसल्याचे शेख यांनी पत्रात नमूद केले. तसेच, प्रभाग क्रमांक २८ मध्ये एका बिगर काँग्रेस व्यक्तीला तिकीट देण्यात आले. या उमेदवाराने दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराकडून तीन लाख रुपये घेतल्यानंतर निवडणूक न लढवताच माघार घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

ॲड. शेख यांनी या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून अभय छाजेड यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी

 शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा...

महिला शेतकरी अधिकार कायद्याच्या अभ्यासासाठी कृतीगट तयार करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शेतीपूरक व्यवसायांसाठी महिलांना विशेष अनुदान देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा...

एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. ११ मार्च २०२६. केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात...

गॅस तुटवड्याचे संकट,भाजपने सोडले पुणेकरांना वाऱ्यावर-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : शहरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाल्याने...