महिलांसाठी खास सॅलरी अकाऊंट सुरू करून येस बँकेने साजरा केला महिला दिन

Date:

मुंबईआंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या येस बँकने येस एसेन्स महिला सॅलरी अकाऊंट लाँच करण्याची घोषणा केली आहे. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आर्थिक तसेच लाइफस्टाइलशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला  एक व्यापक उपाय आहे. आर्थिक संरक्षण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लाइफस्टाइलशी संबंधित गोष्टी आणि संपत्ती निर्मिती या सर्व फायद्यांचा समावेश असलेल्या विशेष सेवा या नवीन ऑफरमधून मिळतील.

भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अहवालानुसार, 201718 आणि 202324 दरम्यान महिला रोजगारात लक्षणीय वाढ झाली आहेग्रामीण भारतात 96% तर शहरी भागातील महिला रोजगारात 43% वाढ झाली आहे. गेल्या सात वर्षांत 1.56 कोटींहून अधिक महिला नोकरी करू लागल्या आहेत. यामुळे अर्थातच एकूण आर्थिक वाढीमध्ये त्यांचा मजबूत सहभाग दिसतो.

ही सातत्यपूर्ण वाढ आरोग्य लाभांसह आर्थिक उपायांची गरज अधोरेखित करते. सातत्याने वाढ होत असलेल्या कार्यबलाशी सुसंगत राहूनयेस एसेन्स महिला सॅलरी अकाउंट तीन महत्त्वाच्या सर्वसमावेशक स्तंभांवर लक्ष केंद्रित करेल:

·         आर्थिक उपाय

o   पहिल्या वर्षासाठी विशेष मोफत लॉकर सुविधा

o   3-इन-1 खात्यावर पहिल्या वर्षासाठी 100% डीमॅट एएमसी सूट

o   पहिल्या वर्षी 34,000 येस रिवॉर्ड्ज मिळवण्याची आणि रिडीम करण्याची संधी

·         आरोग्य सुरक्षा आणि निरोगीपणा  

o   वर्षासाठी 5 लाख रुपये सुपर टॉप-अप आरोग्य कव्हर मोफत

o   वर्षातून एकदा वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी (घरी येऊन तसेच प्रयोगशाळेतही चाचणीची सुविधा)

o   आमच्या भागीदाराने दिलेले 1 वर्षाचे मोफत सदस्यत्वजे पालकत्व टूलकिटस्त्रीरोगतज्ज्ञबालरोगतज्ज्ञमानसशास्त्रज्ञपोषणतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांशी  सल्लामसलत अशा आरोग्य सेवांची सुविधा देते.

·         लाइफस्टाइल खास सुविधा

o   युटिलिटीजकिराणा सामानप्रवास आणि अन्य यासारख्या निवडक श्रेणींवर वार्षिक INR 6,000 पर्यंतच्या 5% कॅशबॅकसह पूरक एलिगन्स डेबिट कार्ड.

या लाँचबद्दल येस बँकेचे रिटेल लायबिलिटीजफी आणि बिझनेस बँकिंगचे कंट्री हेड श्री. धीरज सांघी म्हणाले, “येस एसेन्स महिला सॅलरी अकाउंटद्वारेआम्ही घराबाहेर पडून काम करणाऱ्या महिलांना पाठिंबा देतो. औपचारिक कामकाजात महिलांचा वाढता सहभाग हा भारताच्या विकासाच्या मार्गात एक गतिमान बदल दर्शवतो. व्यावसायिक आणि आर्थिक निर्णय घेण्यामध्ये अधिकाधिक महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यानेएकात्मिकसंरक्षण-नेतृत्वाखालील बँकिंग उपायांची आवश्यकता अत्यंत गरजेची ठरते. हा क्युरेटेड सॅलरी अकाउंट म्हणजे महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देऊन त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला सक्षम बनवणारा सर्वसमावेशक आर्थिक पर्याय तयार करण्याची आमची वचनबद्धता आहे.

या नवीन योजनेसह, येस बँक सर्व ग्राहक वर्गासाठी अधिक समावेशक आर्थिक परिसंस्था तयार करण्यासाठी ग्राहक प्रथम दृष्टिकोन आणि डिजिटल सक्षम सेवांवर लक्ष केंद्रित करते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युगांडा सरकारच्या शिष्टमंडळाची ‘मिनी सरस सावित्री जत्रा २०२६’ ला भेट

पुणे, दि. १० – पुणे जिल्हा परिषद आयोजित “मिनी...

राज्यसभा निवडणुक- 26 नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश

दहा राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील...

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका

मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये...